Thursday, May 23, 2024
Homeमुख्य बातम्याअजित पवार यांच्या भेटीवर शरद पवार पुन्हा बोलले; म्हणाले...

अजित पवार यांच्या भेटीवर शरद पवार पुन्हा बोलले; म्हणाले…

पुणे | Pune

राज्याच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे सत्ताधारी भाजपा, शिंदे गट व नुकताच सत्तेत दाखल झालेला अजित पवार गट विरोधकांच्या मुद्द्यांना फेटाळून लावत आहेत. तर दुसरीकडे विरोधकांकडूनही अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेरलं जात आहे. नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात याचे पडसाद पाहायला मिळाले.

- Advertisement -

मात्र, आता एका भेटीमुळे राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत आत्तापर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी केलेल्या अजित पवारांनी काका शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट गुप्तपणे झाल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यावर दोन्हीकडच्या नेत्यांनी कौटुंबिक नात्यांसाठी भेट झाल्याचं स्पष्टीकरण दिलं. मात्र, या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये वादाचा खडा पडतोय की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यावर काल, रविवारी देखील शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी माध्यमांसमोर येत अजित पवारांची भेट घेतल्याबद्दल मी आधीच स्पष्टीकरण दिलं होतं, असं सांगितलं. तसंच, मविआमध्ये कोणताही संभ्रम नाही, मविआ एकसंध आहे, असं शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

‘एमबीबीएस’ अ‍ॅडमिशनच्या नादात घातले साडे बारा लाख

शरद पवार म्हणाले, अजित पवार हे माझे पुतणे आहेत. पवार कुटुंबात मी वडीलधारा माणूस आहे. त्यामुळे अजित पवार मला भेटायला आले यात गैर नाही. आमची बैठक ही गुप्त नाही. राष्ट्रवादी पक्ष भाजपसोबत जाणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो. ३१ तारखेला मुंबईमध्ये प्राथमिक अजेंडा ठरवण्याची बैठक आहे. या बैठकीला इंडियाचे नेते येणार आहेत. ही बैठक मी स्वत:, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले आयोजित करणार आहोत. अनेक गोष्टींवर या बैठकीत चर्चा होणार आहे. बैठकीला सोनिया गांधी उपस्थित राहणार का? यावर शरद पवार म्हणाले की, अजून बैठकीला येणाऱ्या नेत्यांची यादी आलेली नाही, त्यामुळे त्या येणार की नाही हे सांगता येणार नाही.

यावेळी ठाण्यातील रुग्णालयात झालेल्या मृत्यूच्या तांडवावरही त्यांनी भाष्य केलं. ही अतिशय चिंताजनक प्रकारची गोष्ट आहे. हा प्रकार ठाण्यात घडला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्येही सार्वजनिक रुग्णालयात या प्रकारच्या घटना होत असतील तर राज्य कोणत्या दिशेने जात आहे याचा एक उत्तम नमुना बघायला मिळाला. जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. हा प्रकार टाळण्यासाठी शासनाने तातडीने कठोर पावलं उचलण्याची आवश्यकता आहे, असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

आराम करण्यासाठी मुख्यमंत्री झालात का?; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

तसेच, टोमॅटोचे भाव वाढले आहेत. शेतकऱ्यांना चार पैसे मिळत असताना नेपाळकडून केंद्र सरकार टोमॅटो खरेदी करत आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. दोन पैसे शेतकऱ्यांना मिळतात म्हटल्यावर परदेशातून माल आणण्याची भूमिका सरकार घेते. शेतकरी उत्पादक आहे, त्याला दोन पैसे जास्त मिळत असतील तर त्याच्या पाठी उभं राहण्या ऐवजी आज त्याला यातना कशा देता येईल ही भूमिका राज्यकर्ते घेत आहेत. अशा प्रकारे टोमॅटो आयात करणं हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे, अशी टीका त्यांनी केली.

नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणासाठी सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना, शरद पवार म्हणाले की, मलिक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न मी काल केला होता. आज त्यांना जेलमधून सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी ते जेलमधून बाहेर आल्यावर त्यांच्याशी संवाद साधणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या