कोल्हापूर | Kolhapur
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राजकारणात अशा प्रसंगी कटुता ठेवू नये. यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारानूसार आम्ही वागणारी माणसे आहोत, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितले. पंतप्रधानांनी ७५ व्या वर्षांत पदार्पण केले, मी त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. मी त्यांना पत्र लिहीले, ट्विटही केले. राजकारण मध्ये न आणता सभ्य आणि सुस्कृंतपणा यांच दर्शन दाखवले पाहिजे, त्या दृष्टीने देशातील आणि देशाबाहेरच्या अनेकांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले, त्यांना शुभेच्छा दिल्या, जे योग्यच आहे.
मी ७५ व्या वर्षानंतर थांबलो नाही त्यामुळे…
नरेंद्र मोदींना अवतारपुरुष म्हणण्याच्या गोष्टी मला समजत नाही. मी ७५ व्या वर्षानंतर मी थांबलो नाही त्यामुळे पंतप्रधानांनी थांबावे हे सांगायचा मला नैतिक अधिकार नाही. मी ८५ वर्षांचा आहे. ज्या काही जाहिराती आल्या त्यात वर्तमानपत्रांना आनंद असतो. एकनाथ शिंदेंनी जाहिराती दिल्या असतील ठीक आहे तो त्यांचा प्रश्न आहे असे शरद पवार म्हणााले.
सोन्याचा नांगर वापरून शिवरायांनी संदेश दिला
शिवरायांबद्दल आपण सगळेचे आदर व्यक्त करतो. एकदा शिवरायांनी दुष्काळानंतरच्या पावसात सोन्याचा नांगर केला. सोन्याचा नांगर वापरुन शिवरायांनी एक संदेश दिला.सध्या शेतीचे नुकसान झालेय. महाराष्ट्रात अनेक जागी अतिवृष्टी झाली,शेतीचे नुकसान झाले. जमिनी वाहून गेल्या, सोयाबीन उद्ध्वस्त झाले. सरकार पंचनामे कधी करतेय, मदत कधी पोहोचतेय, बघूया…देवाभाऊंनी पंचनामे आणि मदतीकडे लक्ष द्यावे, असे शरद पवारांनी सांगितले.
सरकारी जाहिराती फार कमी
देवाभाऊ जाहिराती पाहिल्या तर त्या खासगी दिसत आहेत. सरकारी जाहिराती फार कमी आहेत. देवाभाऊ म्हणून ज्या जाहिराती आल्या आहेत त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची भावना व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येकाचे कामच आहे, मात्र मी वेगळा विचार करतो असे शरद पवार म्हणाले.
सगळीकडेच मविआची युती असेल असे नाही
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सगळीकडेच मविआची युती असेल, असे नाही. स्थानिक समीकरणे बघून निर्णय घेऊ, असे शरद पवार म्हणाले. काही ठिकाणी एकत्र लढू, काही ठिकाणी स्वतंत्र लढू, असेही शरद पवारांनी सांगितले. ठाकरे बंधू एकत्र येऊन ताकद वाढली तर चांगलेच आहे. मुंबई, ठाण्यामध्ये ठाकरेंची ताकद, शक्ती आहे. मुंबई, ठाण्यात ठाकरेंनी जास्त जागा मागण्यात गैर काही नाही, असेही शरद पवार म्हणाले.
हैदराबाद गॅझेट एक दिशा दाखवणारे आहे. मला स्वतःला हैदराबाद गॅझेटबद्दल माहिती नव्हती. आपल्यातली एकीची वीण उसवू नये. कटुता वाढू नये, सुसंवाद वाढावा, असे शरद पवार म्हणाले. सरकारने मराठा आणि ओबीसींची समिती स्थापन केली. दोन्ही समित्यांत एकाच जातीचे सदस्य आहेत. ऐक्य घडवायचे तर समित्यांत एकाच जातीचे लोक का?, असा सवालही शरद पवारांनी उपस्थित केला. परभणी,बीड,धाराशिवमध्ये मराठा-ओबीसींमध्ये कटुता वाढली. एकमेकांच्या हॉटेलातही जायचे नाही अशी कटुता वाढलीय.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




