Saturday, November 9, 2024
Homeराजकीय"…तर भटकती आत्मा तुम्हाला सोडणार नाही"; मोदींच्या 'त्या' टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर

“…तर भटकती आत्मा तुम्हाला सोडणार नाही”; मोदींच्या ‘त्या’ टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर

मुंबई | Mumbai

लोकसभा निवडणूक (Loksabha Election) प्रचाराच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शरद पवारांचा ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर काल अहमदनगर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवारांनी मोदींना टोला लगावत, “ही भटकती आत्मा तुम्हाला सोडणार नाही”, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, ” पंतप्रधान मोदींनी निवडणुकीदरम्यान सर्व मर्यादा पाळल्या नाहीत. पंतप्रधान (Prime Minister) हा कुठल्या एका पक्षाचा नसतो तो देशाचा असतो. त्यांनी सर्व जाती धर्म, भाषा आणि प्रांताचा विचार करायचा असतो. आम्ही राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करतो, पण मर्यादा पाळतो. मात्र, त्यांनी माझा भटकता आत्मा म्हणून उल्लेख केला. हे त्यांनी मुद्दाम केलं. कारण त्यांची विचारधारा तशीच आहे. पंरतु, एका दृष्टीने हे बरे झाले, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा कायम राहतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही,” असा इशारा शरद पवारांनी (Sharad Pawar) मोदींना दिला.

पवार पुढे म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी शिवसेनेची (Shivsena) निर्मिती केली. त्या शिवसेनेने राज्य केले. त्यांनी मराठी माणसाचा आत्मविश्वास वाढवला, त्यांचा उल्लेख करताना त्यांनी नकली बापाची शिवसेना असा केला. हे त्यांना शोभते का? मोदींना तारतम्य राहिले नाही, सत्ता जाणार हे दिसले की माणूस अस्वस्थ कसा होतो हे यातून दिसले आहे, असे शरद पवारांनी म्हटले. त्यामुळे आता यावर भाजपकडून (BJP) काय प्रत्युत्तर येते हे बघणे महत्वाचे असणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या