Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar Lalbaugcha Raja Darshan : अनेक वर्षांनंतर शरद पवार लालबागच्या राजाच्या...

Sharad Pawar Lalbaugcha Raja Darshan : अनेक वर्षांनंतर शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला; नात, जावयासह बाप्पाच्या चरणी झाले लीन

मुंबई | Mumbai

मुंबईसह राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह असून घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणपतीसाठीही भाविकांची लगबग सुरू आहे.

- Advertisement -

गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असलेलं लालबाग (Lalbaghcha Raja) सध्या गजबजून गेलं आहे. भाविकांसह अनेक राजकीय नेतेमंडळींनीही लालबागमधील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे.

YouTube video player

लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी आज (सोमवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar Party) सर्वेसर्वा आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी हजेरी लावली.

हे देखील वाचा :  ममतांना मोठा धक्का! ‘तृणमूल’वर गंभीर आरोप करत खासदाराचा राजीनामा

आपले जावई सदानंद सुळे (Sadanand Sule) आणि नात रेवती सुळे (Revati Sule) यांच्यासोबत शरद पवार लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी पोहोचले.

दरम्यान, शरद पवार हे मुख्यमंत्री असताना एकदा लालबागच्या राज्याच्या दर्शनाला आले होते. त्यानंतर आता त्यांनी अनेक वर्षांनंतर आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.

करोना काळात रक्तदान शिबिराचं आयोजन लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं केलं होते, त्यावेळी देखील शरद पवार आले होते. मात्र, त्यावर्षी गणपतीची स्थापना करण्यात आली नव्हती. फक्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं.

ताज्या बातम्या

Maharashtra News : प्रदूषण नियंत्रण मंडळाला उच्च न्यायालयाचा झटका; ‘या’ सुविधेवर...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) उच्च न्यायालयाने (High Court) झटका दिला . एमपीसीबीला धोकादायक आणि इतर कचरा (व्यवस्थापन...