Monday, May 27, 2024
Homeनगरपवारांनी नगरला पाठविली रेमेडिसीवर इंजेक्शन

पवारांनी नगरला पाठविली रेमेडिसीवर इंजेक्शन

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

करोना उपचारा दरम्यान बाधितांना देण्यात येणारी रेमेडिसीवर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. आ.संग्राम जगताप यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी तातडीने नगरला इंजेक्शन पाठविली. पवारांनी दिलेली 48 रेमेडिसीवर इंजेक्शन हे गरजूंना मोफत दिली जाणार असल्याची माहिती आ.जगताप यांनी दिली.

- Advertisement -

जिल्ह्यामध्ये करोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच रेमेडिसीवर इंजेक्शनचा साठा संपल्यामुळे चिंता निर्माण झाली. आ. जगताप यांनी ही बाब मुंबई भेटीत पवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याची दखल घेत खा. शरद पवार यांनी लगेच गरजूंसाठी 48 रेमेडिसीवर इंजेक्शन तत्काळ पाठविली. हे इंजेक्शन सर्वसामान्य कोरोना रुग्णांना देण्यात येणार आहे. अहमदनगर शहर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांच्याकडे आ. जगताप यांनी हे इंजेक्शन सुपूर्त केले. ते गरजूंपर्यंत हे इंजेक्शन पोहचवतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

यावेळी नगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, युवकचे अध्यक्ष अभिजित खोसे, वैभव ढाकणे, पराग झावरे, भुपेंद्र खेडकर, किरण रासकर आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या