मुंबई | Mumbai
लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) महायुतीला राज्यात अस्मान दाखविले आहे. त्यामुळे माविआचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीला कात्रजचा घाट दाखविण्यासाठी मविआच्या नेत्यांनी आतापासूनच कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांसह महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्षांतील माजी आमदार मविआतील तिन्ही घटक पक्षांत प्रवेश करत आहेत.
हे देखील वाचा : वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या IAS अधिकारी पूजा खेडकर पहिल्यांदाच आल्या कॅमेऱ्यासमोर; म्हणाल्या, “मी काम…”
अशातच आज लातूर जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. मुबंईतील वाय बी.चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलतांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी विधानसभेला मविआचे किती आमदार निवडून येणार? याचा आकडाच सांगितला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात शरद पवारांच्या या आकड्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
हे देखील वाचा : Nashik Accident News : उभ्या असलेल्या कंटेनरवर कार जाऊन धडकल्याने भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यरत आहे. महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर राष्ट्रवादी पक्षाला बळ दिले पाहिजे असे सगळ्यांना वाटते.महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे. लोकसभा लोकांनी हातात घेतली.लोकांनी मोदीचे सरकार पाहिले आणि बदलण्याचा निर्णय घेत ३१ जणांना निवडून दिले. यामध्ये राष्ट्रवादीच्या १० पैकी ८ जागा निवडून आल्या. हा एक संदेश आहे. त्यामुळे येणाऱ्याविधानसभेला राज्यातील २८८ जागांपैकी २२५ पेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे देखील वाचा : BLOG : वाढत्या लोकसंख्येचे आव्हान
तसेच पुढे ते म्हणाले की, “आजच्या प्रवेशाचे वैशिष्ट्य हे आहे की एक नेते उदगीरचे आणि दुसरे देवळालीचे. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार लोकांनी निवडून दिला, पण दोन्ही विजयी उमेदवारांनी लोकांचा घात केला.तुम्ही येताना वेगळ्या नावाने मत मागता आणि दुसरीकडे जाता हे लोकांना पटत नाही.ज्यांनी जनतेचा घात केला त्या लोकांना धडा शिकवायचा आहे असे म्हणत शरद पवारांनी अजित पवार गटावर (Ajit Pawar Group) टीका केली.
व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
“.