Thursday, December 12, 2024
HomeनाशिकNashik Accident News : उभ्या असलेल्या कंटेनरवर कार जाऊन धडकल्याने भीषण अपघात;...

Nashik Accident News : उभ्या असलेल्या कंटेनरवर कार जाऊन धडकल्याने भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) मालेगावच्या (Malegaon) वाके शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर टाटा पंच गाडी जाऊन धडकल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू (Death) झाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : गांज्याचे कनेक्शन तेलंगाणा व्हाया नाशिक

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मीनाक्षी अरुण हिरे, सुनंदा विकास सावंत आणि चिंतामण सावंत असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर नात वैभवी प्रवीण जाधव ही गंभीर जखमी झाली आहे. वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना सदरचा अपघात (Accident) घडला असून यात दोन मुलींसह जावयाचा मृत्यू झाला आहे.

हे देखील वाचा : संपादकीय : ११ जुलै २०२४ – अंमलबजावणी विवेकबुद्धीवर अवलंबून?

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी दाखल होत जखमी झालेल्या वैभवी प्रवीण जाधव हिला उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल केले. त्यानंतर मयत तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या घटनेमुळे मालेगावात हळहळ व्यक्त होत आहे.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या