Sunday, April 27, 2025
Homeनगरमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला पाठींबा; पवारांची ‘मराठा मोर्चा’शी चर्चा

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला पाठींबा; पवारांची ‘मराठा मोर्चा’शी चर्चा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे की नाही, याबाबत मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठिंबा असेल. आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांना तीन मुद्दे दिलेले असून त्यानूसार चर्चा करून मार्ग काढला जावू शकतो, अशी माहिती ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी शनिवारी येथे दिले. या मुद्यावर सरकारला सहकार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

छत्रपती संभाजीनगर येथून पुण्याकडे जात असताना शनिवारी रात्री पवार काही वेळ नगरला थांबले होते. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे शिष्टमंडळ त्यांना भेटले. यावेळी शिष्टमंडळाने मराठा आरक्षण व ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळण्याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या संघर्षाची माहिती दिली. तुम्ही ज्येष्ठ नेते असल्याने तुमच्यावर समाजाची आशा एकवटली आहे, असे पवार यांना सांगितले.

त्यावर पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली आहे. याबाबत येत्या आठ दिवसात ते बैठक घेणार आहेत. काही तांत्रिक अडथळे आहेत, परंतु सरकारमधील सर्व पक्ष मिळून आम्ही मार्ग काढू, असे मुख्यमंत्री मला म्हणाले आहेत. त्यामुळे ते जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा राहील व याबाबत त्यांना सर्व सहकार्य राहील. कोणतेही राजकारण आमच्याकडून होणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

राज्य सरकारने आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांच्या वर नेण्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे नेऊन तो त्यांनी मंजूर करून घेतला तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबतचा विषय राहणार नाही. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळेल व ओबीसी यांनाही त्याबाबत हरकत असणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांकडे सुचवल्याचे पवार म्हणाले. मुख्यमंत्री सर्वांची जी बैठक घेणार आहेत, तिला जरांगे पाटील यांच्या लोकांनाही बोलवा. त्यांना अंधारात ठेवू नका, काय करणार ते स्पष्टपणे सांगा. त्याला आमचा पाठिंबा असेल, असेही पवार म्हणाले. दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे की न द्यावे याबाबत आता आपण काहीही भाष्य करणार नाही, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी त्यांचे स्वागत केले. मदन आढाव, स्वप्निल दगडे, मिलिंद जपे, अमोल पवार, गजेंद्र दांगट, विलास तळेकर, सागर भोसले, ऋतुराज आमले, शिवाजी मुंगसे, तुषार लांडे, शशिकांत भामरे आदी उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...