Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar: भारत-अमेरिका व्यापार करारावर शरद पवारांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले, "मला...

Sharad Pawar: भारत-अमेरिका व्यापार करारावर शरद पवारांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले, “मला काही गोष्टींची चिंता…”

बारामती | Baramati
बारामती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापार कराराबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. कराराचा संपूर्ण मसुदा अद्याप समोर आलेला नसला तरी आतापर्यंत समोर आलेल्या बाबींवरून भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी चिंता निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

ही तरतूद भारतातील कृषी क्षेत्राच्या दृष्टीने चिंता करण्यासारखी
शरद पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, जागतिक पातळीवर अमेरिकेने भारतातवर जे कर आकारले होते त्यात काही प्रमाणात कर कपातीचा निर्णय घेतला आहे. मला काही गोष्टींची चिंता आहे. अमेरिका आणि भारतातील या नव्या कराराचे स्पष्ट चित्र आणखी २ दिवसांत देशासमोर येईल. त्यानंतर त्यावर सविस्तर भाष्य करणे योग्य होईल. परंतु आज जे लोकांसमोर अमेरिकेकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यात कृषी क्षेत्रात अमेरिकेला निर्यात करता येईल अशी तरतूद आहे. ही तरतूद भारतातील कृषी क्षेत्राच्या दृष्टीने चिंता करण्यासारखी आहे.

- Advertisement -

Sharad Pawar: “त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे?” विलिनीकरणाच्या चर्चांवर शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं

YouTube video player

शरद पवार पुढे म्हणाले, अमेरिका हा शक्तीशाली देश आहे. आर्थिक ताकद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी एखाद्या क्षेत्रातील उत्पादनाची निर्यात इतर देशात करायची ठरवली तर त्या देशाच्या त्या क्षेत्रातील उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. ती स्थिती भारतीय शेतीच्या बाबतीत येऊ नये अशी अपेक्षा आहे असे त्यांनी सांगितले.

Ajit Pawar: विमान अपघाता होण्याआधी अजित पवारांचं कोणाशी झालं संभाषण? समोर आलं रेकॉर्डिंग

अर्थसंकल्प ऐकण्याची संधी मला यावेळी मिळाली नाही
नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मांडण्यात आला. यावर शरद पवार म्हणाले की, ” सभागृहामध्ये जेव्हा अर्थसंकल्प मांडला जातो, तेव्हा माझी गैरहजेरी आजपर्यंत कधी झाली नव्हती. पण दुर्दैवाने कौटुंबिक आघातामुळे मी दिल्लीला जाऊ शकलो नाही. त्यामुळे सभागृहात जाऊन अर्थसंकल्प ऐकण्याची संधी मला यावेळी मिळाली नाही. पण जे काही वाचले त्यात 2-3 गोष्टी दिसतात. सामान्य माणसाच्या हिताच्या गोष्टी अंदाजपत्रातून जाणीवपूर्वक टाळल्या आहेत. या अंदाजपत्रकामध्ये विकासाला अधिक ठोस गती येईल असे काही नाही, असे म्हणून शरद पवारांनी टीका केली.

लष्करप्रमुखांनी काहीतरी लिहून ठेवले आहे त्याचा अर्थ काही तरी चिंतेची स्थिती आहे
मनोज नरवणे हे देशाचे लष्करप्रमुख होते. त्यांनी काही लिखाण केले असेल आणि त्याचा उल्लेख विरोधी पक्षनेते करत असतील तर हा त्यांचा अधिकार आहे. आज कारण नसताना देशात संशयाचे वातावरण होतंय. लष्करप्रमुखांनी काहीतरी लिहून ठेवले आहे त्याचा अर्थ काही तरी चिंतेची स्थिती आहे. त्याची चर्चा झाली असती तर लोकांना वस्तूस्थिती कळली असती. मनोज नरवणेंचे पुस्तक प्रकाशित झाले नाही परंतु जर माझ्या हातात त्या पुस्तकाची कॉपी आहे ती मी दाखवली. अध्यक्षांनी सांगितले हे अधिकृत करा, तेही केले. तर त्यावर चर्चा व्हायला हवी होती असंही शरद पवारांनी म्हटलं.

ताज्या बातम्या

Nashik Fire News : सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग

0
सिन्नर | वार्ताहर | Sinnar तालुक्यातील माळेगाव एमआयडीसी (Malegaon MIDC) परिसरातील मोहदरी वन उद्यानाजवळ असलेल्या “विमा ॲरोमॅटिक्स” या कंपनीला आज अचानक भीषण आग (Fire) लागल्याची...