Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूज“महाराष्ट्रात मणिपूरसारखी स्थिती…”, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

“महाराष्ट्रात मणिपूरसारखी स्थिती…”, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

मुंबई | Mumbai

- Advertisement -

शरद पवार यांनी रविवारी नवी मुंबईमधील जाहीर सभेमध्ये बोलताना महाराष्ट्रामध्येही मणिपूरप्रमाणे हिंसाचार होईल की काय अशी भीती वाटत असल्याचं विधान केलं आहे. नवी मुंबईतील वाशीमध्ये सामाजिक ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी महाराष्ट्रातील सामाजिक स्थितीबद्दल भाष्य केले.

शरद पवार म्हणाले की, मणिपूरबद्दल देशाच्या संसदेत चर्चा झाली. मणिपूरचे विविध धर्माचे, भाषेचे लोक दिल्लीत आम्हाला भेटले. त्यांनी तेथील विदारक चित्र कथन केले. आता पिढ्यानुपिढ्या एकत्र असलेले लोक अस्वस्थ झाले आहेत. दोन जमातीत वाद झाला आहे. शेती उद्ध्वस्त झाली. स्त्रियांवर अत्याचार झाल्याचे चित्र त्यांनी आम्हाला सांगितले.

हे ही वाचा : शिंदे गटाचा श्रीरामपूर, नेवासा मतदारसंघांवर डोळा

इतके मोठे संकट एका राज्यावर आल्यानंतर राज्यकर्त्यांची जबाबदारी वाढते. त्यांनी तेथील वातावरण शांत करण्यासाठी, सामाजिक ऐक्य जपण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पण, दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांनी त्याकडे ढुंकुनही पाहिले नाही, असे शरद पवार म्हणाले. मणिपूरमध्ये जे घडलं तेच आजुबाजूच्या राज्यात घडलं. कर्नाटकात घडले. संसदेत मणिपूरमधील हिंसाचाराची चर्चा झाली. मणिपूरमध्ये पिढ्यान-पिढ्या एकत्र असलेला लहानसा प्रांत अस्वस्थ झालाय,” असं शरद पवारांनी म्हटलं.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं राज्य हे भोसल्यांचं राज्य किंवा शिवाजी महाराजांचं राज्य म्हणून ओळखलं गेलं नाही. तर ते रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखलं गेलं. राज्यातील सर्वसामान्यांचं हे राज्य आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कृतीतून हेच सूत्र आपल्यासमोर मांडलं आहे. आपण त्याचं पालन करण्याची गरज आहे.

हे ही वाचा : शपथविधीवेळी नार्वेकरांकडून उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा उल्लेख; तर गवळी यांची ‘जय…

- Advertisment -

ताज्या बातम्या