Tuesday, September 17, 2024
Homeराजकीयशरद पवारांचे राज्यातील तणावपूर्ण स्थितीवर मोठे विधान; म्हणाले, “ शांतता प्रस्थापित...

शरद पवारांचे राज्यातील तणावपूर्ण स्थितीवर मोठे विधान; म्हणाले, “ शांतता प्रस्थापित करायची असेल तर…”

मुंबई | Mumbai

- Advertisement -

बांगलादेशमध्ये (Bangladesh) सत्तांतर झाल्यानंतर तेथील हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या विविध टीव्ही चॅनेलच्या माध्यमांतून समोर येत आहे. त्यावरून देशातील वेगवेगळ्या ठिकाणी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच काल राज्यातील काही ठिकाणी त्याचे पडसाद देखील पाहायला मिळाले. बऱ्याच ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती दिसून आली. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावरही टीका केली.

हे देखील वाचा : “नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे कटकारस्थान करून…”; अनिल देशमुखांचा सरकारवर गंभीर आरोप

यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, “बंगलादेशात सत्तापरिवर्तन झाले, तिथे काही गोष्टी घडल्या, त्याची प्रतिक्रिया भारतात काही ठिकाणी उमटत आहे. बांगलादेशमध्ये जे घडले त्याचे परिणाम महाराष्ट्रातून येतील असे काही वाटले नाही. त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही.पण आज समाजातील सर्व घटकांमध्ये एकवाक्यता आणि सामंजस्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात जे काही घडले, ते राज्याच्या (State) हिताचे नाही. राज्यात शांतता प्रस्थापित करायची असेल तर समाजकारण आणि राजकारणातील (Political) व्यक्तींनी सयंमाचा पुरस्कार करावा आणि शांतता कशी राहिल, याबद्दलची खबरदारी घ्यावी, एवढेच मी सांगू इच्छितो”, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : मविआचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेच्या रकमेत किती वाढ करणार? राऊतांनी थेट आकडाच सांगितला

पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, “शासनाची (Government) भूमिका आणि गृह खात्याची जबाबदारी यावर भाष्य करता येईल. मात्र आज मला शांतता आणि सौहार्द याचे जास्त महत्त्व वाटते. म्हणून मी अन्य बाबींवर भाष्य करू इच्छित नाही. शांतता कशी प्रस्थापित होईल, याबाबत मी अधिक आग्रही आहे. बांगलादेशमध्ये जे घडले त्याच्या परिणामाचे काही कारण होते. अन्य देशात घडलेल्या गोष्टींसाठी आपल्या देशातील सर्वसामान्य लोकांचे जीवन उद्धवस्त होईल किंवा संकटात जाईल, असे काही करू नये”, असे पवारांनी म्हटले.

हे देखील वाचा : संपादकीय : १७ ऑगस्ट २०२४ – कोणाच्या तरी हास्याचे कारण व्हा

पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्राबद्दलचा निर्णय विरोधाभास

भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना सर्व देशाच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्या, या पद्धतीची भूमिका मांडली. ती भूमिका मांडून १२ तास होत नाहीत, तोवरच जम्मू-काश्मीर आणि हरियाणाची निवडणूक जाहीर झाली. झारखंड आणि महाराष्ट्राची मात्र निवडणूक जाहीर झाली नाही. त्यामुळे पंतप्रधानाचा महाराष्ट्राबद्दलचा निर्णय हा एक प्रकारचा विरोधाभास आहे, याबद्दल आणखी काय सांगायचे, असे शरद पवारांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या