Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar : "आमची अपेक्षा होती तसा..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवारांची...

Sharad Pawar : “आमची अपेक्षा होती तसा…”; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

काल विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) निकाल (Result) जाहीर झाला. यात महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.राज्यात महायुतीला २३० जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीला ५० चा आकडाही पार करता आला नाही. खरं तर ही विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती (Mahavikas Aaghadi) अशी अटीतटीची होईल असे बोलले जात होते. पण महायुतीने (Mahayuti) मोठे घवघवीत यश मिळवले. दुसरीकडे महाविकास आघाडीला फारसे यश मिळवता आले नाही, उलट आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. अशातच आता यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते कराडमध्ये माध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात कोणत्या पक्षाला किती मतं? समोर आली आकडेवारी

यावेळी बोलतांना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, “हा लोकांनी निर्णय दिला आहे. आमची अपेक्षा होती तसा निकाल लागला नाही. पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे. असा अनुभव आम्हाला कधी आला नाही. मात्र आता याचा अभ्यास करावा लागणार आहे. आम्ही पुन्हा एकदा कामाला लागू. मी याबाबत काही बोलू इच्छित नाही. या निकालानंतर आम्ही त्याची कारणमीमांसा करू. त्यानंतर पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करू. मी निवृत्त व्हावे की नाही, हे मी आणि माझे सहकारी ठरवतील. दुसऱ्यांनी कशाला सांगायला पाहिजे”, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Maharashtra News : राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी ‘या’ नेत्याची निवड

पुढे ते म्हणाले की, “लोकांनी दिलेल्या निर्णयाचा मी अभ्यास करणार आहे. तसेच या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यामुळे मतांचे ध्रुवीकरण झाले.लाडकी बहीण योजनेबाबत महायुतीकडून अपप्रचार करण्यात आल्यामुळे त्याचाही काही फटका आम्हाला बसला. लोकसभेला (Loksabha) जो नागरिकांनी निर्णय घेतला. त्यामुळे आमच्यात अधिकचा विश्वास होता. महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी काम केले. कोणीही मागे राहिले नाही. आमच्या काही सहकाऱ्यांनी ईव्हीएमवर (EVM) शंका घेतली. मात्र, याबाबत जोपर्यंत अधिकृत माहिती हातात येत नाही तोपर्यंत मी याबाबत काहीही भाष्य करणार नाही. निवडणुकीत पैशांचा वापर आतापर्यंत असा कधी पाहायला मिळाला नव्हता”, असेही शरद पवार यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...