Thursday, January 8, 2026
Homeक्राईम2 कोटींची फसवणूक करणारा आरोपी बिर्याणी पार्टीतून उचलला

2 कोटींची फसवणूक करणारा आरोपी बिर्याणी पार्टीतून उचलला

मित्रांसमवेत गंगापूर ते येवला रोडच्या बाजूला करत होता पार्टी

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

शेअर मार्केट गुंतवणुकीत दोन कोटीची फसवणूक करणार्‍या गणेश बाळासाहेब उर्फ बाळकृष्ण कुलट या आरोपीला मित्रांसमवेत तर्रर्र नशेमध्ये बिर्याणी पार्टी करत असताना शेवगाव पोलीस पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून जेरबंद केले आहे. याप्रकरणी बबन शिरसाठ (रा. नविन खामपिंप्री ता. शेवगाव) यांच्या फिर्यादीवरून सीडीजी इनव्हेस्टमेंट शेअर मार्केट (आंतरवली खुर्द ता. शेवगाव) येथे या कंपनीच्या नावाखाली 2 कोटी रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून फसवणूक झाल्याचा गुन्हा 12 अ‍ॅागस्ट रोजी गुन्हा शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या गुन्ह्यातील आरोपी हा गंगापूर जिल्हा-छत्रपती संभाजीनगर भागात आल्याचे समजले. भदाणे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून दोन पोलीस पथक तपासासाठी तातडीने रवाना केले. त्यातील एक पोलीस पथक पैठण (छत्रपती संभाजीनगर) भागात तर दुसरे पोलीस पथक गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे रवाना करण्यात आले होते. आरोपी कुलट (रा. आंतरवली खु. ता.शेवगाव) व त्याचे मित्र गंगापूर ते येवला जाणारे रोडच्या बाजुला तर्र नशेमध्ये बिर्याणी पार्टी करत असताना पोलीस पथकाने त्यांना सापळा लावून शिताफीने ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील आरोपी कुलट विरुद्ध कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात संपर्क साधावा ,असे आवाहन करण्यात आले आहे.

YouTube video player

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक भदाणे, सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, हवालदार परशुराम नाकाडे, शाम गुंजाळ, संतोष वाघ, बाप्पासाहेब धाकतोडे, संपत खेडकर, राहुल खेडकर तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे नितीन शिंदे, राहुल गुड्डू यांनी केली. पुढील तपास गुन्ह्यांचा तपास धरमसिंग सुंदरडे करत आहेत.

ताज्या बातम्या

टॅरिफ

रशियावर ५०० टक्के टॅरिफ लादणाऱ्या विधेयकाला अमेरिकेत मंजुरी; भारतावरही ‘इतके’ टक्के...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियावर ५०० टक्के आयातशुल्क (टॅरिफ) लादण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भातील विधेयक पुढील आठवड्यात संमत होण्याची...