Thursday, January 8, 2026
Homeक्राईमव्यावसायिकाची 15 लाखांची फसवणूक

व्यावसायिकाची 15 लाखांची फसवणूक

शेअर ट्रेडिंगमध्ये अधिक नफ्याचे आमिष

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची 15 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी व्यावसायिक राजीव अनंत सहस्त्रबुध्दे (वय 53 रा. सिध्दीविनायक सोसायटी, सावेडी) यांनी मंगळवारी (11 जून) सायंकाळी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी 60 व्हीआयपी इन्स्टॉलेशन अकाऊंट या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील अ‍ॅडमीन अक्षिता बोरा नावाने असलेल्या एका मोबाईल नंबर धारक व्यक्तीविरूध्द फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्ट कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरचा प्रकार 18 मार्च 2024 ते 6 मे 2024 दरम्यान घडला आहे. अक्षिता बोरा या नावाने व्हॉट्सअप ग्रुपवर असलेल्या एका मोबाईल नंबर धारक व्यक्तीने राजीव सहस्त्रबुध्दे यांच्यासोबत संपर्क केला. शेअर टे्रडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देतो असे सांगून विश्वास संपादन केला.

YouTube video player

सहस्त्रबुध्दे यांनी त्या व्यक्तीवर विश्वास ठेऊन 15 लाख 55 हजार रूपयांची गुंतवणूक केली. दरम्यान त्यांना नफा मिळाला नाही व गुंतवणूक केलेली रक्कम देखील परत मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करत आहेत.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात पोलीस पथकावर जमावाचा हल्ला

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपुरातील वार्ड नं.1 इराणी गल्ली परिसरात शासकीय कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्याची, जमावाला भडकावून आरोपी सोडवण्याची आणि कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न...