Friday, November 22, 2024
Homeनगरशिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रा. गाडेंसह चौघांवर गुन्हा

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रा. गाडेंसह चौघांवर गुन्हा

हॉटेलच्या वेटरला धमकावल्याचा आरोप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सक्कर चौकातील हॉटेल उदयनराजे पॅलेसच्या वेटरला धमकावल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यासह चौघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रिन्सकुमार हरिनारायण सिंग (वय 25 रा. उदयनराजे हॉटेलच्या पाठीमागे, सक्कर चौक, नगर) यांनी तक्रार दिली आहे.
प्रा. गाडे यांच्यासह राकेश सिंग, युवराज गाडे, रमाकांत गाडे (सर्व रा. यश पॅलेस हॉटेल, सक्कर चौक, नगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

सिंग यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आपण यापूर्वी यश पॅलेस हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होतो. परंतु सहा महिन्यांपूर्वी आपण ते काम सोडले असून सध्या हॉटेल उदयनराजे पॅलेसमध्ये काम करत आहोत. याचा राग मनात धरून हॉटेल यश पॅलेसचा व्यवस्थापक राकेश सिंग याने मोबाईलवर फोन करून ‘तू उदयनराजे हॉटेलवर कामाला का गेला, असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच पुन्हा वारंवार फोन करून शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच त्याच फोनवरून शशिकांत गाडे, रमाकांत गाडे, युवराज गाडे यांनीही शिवीगाळ करत तू नगर सोडून जा अशी धमकी दिली असल्याचे म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांच्या विरूध्द भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 351 (2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार बनकर अधिक तपास करत आहेत.

खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे हे आजारी असून पुण्यात उपचार घेत आहेत. तरीही त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेकडून पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. तसेच, दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेनंतर मंगळवारी रात्री हॉटेल यश पॅलेसवर दगड फेक करण्यात आल्याचा दावा करत दहशत निर्माण करणार्‍या सचिन कोतकर यांचा खुनाच्या गुन्ह्यातील जामीन रद्द करण्यासाठी व त्यांना जिल्हाबंदी पूर्ववत लागू करण्यासाठी न्यायालयात मागणी करणार असल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले. पत्रकार परिषदेस शहर प्रमुख संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, संदेश कार्ले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या