- Advertisement -
येवला| प्रतिनिधी Yeola
शहर व परिसरात आजही, गुरुवारी (दि. १५) दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याने शहरातील गंगा दरवाजा भागात पत्र्याचे शेड कोसळून त्याखाली दबल्या गेल्याने अशोक जाधव (वय 60) जखमी झाले.
आज, सकाळपासूनच वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. तर दुपारी, वातावरणात बदल होवून सुमारे तासभर जोरदार पावसाने हजेरी लावली. शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात सलग गेल्या तीन दिवसांपासून वादळीवाऱ्यासह पावसाची हजेरी सुरू आहे. या अवकाळी पावसाने तालुक्यातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.