Tuesday, January 6, 2026
HomeनगरShevgav : शेवगाव नगराध्यक्षपदी शिंदे शिवसेनेच्या माया मुंडे

Shevgav : शेवगाव नगराध्यक्षपदी शिंदे शिवसेनेच्या माया मुंडे

राष्ट्रवादी (अजित पवार) 10, भाजप 7, शिवसेना 3 तर शरद पवार गटाचा 4 जागांवर विजय

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी अत्यंत चुरशीने झालेल्या चौरंगी लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या माया अरुण मुंडे यांनी बाजी मारली. त्यांनी नजीकचे प्रतिस्पर्धी, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विद्या अरुण लांडे यांच्यावर 86 मतांनी विजय मिळवला. नगराध्यक्ष पदाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रत्नमाला महेश फलके या तिसर्‍या आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या परवीन एजाज काझी या चौथ्या क्रमांकावर राहिल्या. फलके व काझी यांच्यात फक्त 3 मतांचा फरक आहे. तर 12 प्रभागातील नगरसेवकांच्या 24 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 10, भारतीय जनता पक्षाला 7, शिवसेना शिंदे गटाला 3 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 4 जागा मिळाल्या. या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी 69 टक्के मतदान झाले होते. एकूण 35,479 मतदारांपैकी 24,521 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

- Advertisement -

नगराध्यक्षपदाचे उमेदवार, पक्ष व मिळालेली मते – परविन एजाज काझी (राष्ट्रवादी शरद पवार)- 5438, विद्या भाऊसाहेब गाडेकर (अपक्ष)- 177,रत्नमाला महेश फलके (भारतीय जनता पक्ष )- 5441, वंदना वेणीमाधव भारदे (अपक्ष)- 141 माया अरुण मुंडे (शिवसेना शिंदे)- 6591, विद्या अरुण लांडे (राष्ट्रवादी अजित पवार)- 6505,नोटा- 228. सर्वाधिक मतांनी विजयी उमेदवार- नगरसेवक पदाच्या निवडणुकीत प्रभाग 11 मधून भाजपाच्या सविता फडके या सर्वाधिक 927 मताधिक्याने विजयी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे निलेश फुलचंद रोकडे हे दुसर्‍या क्रमांकावर 569 मताधिक्याने विजयी झाले, त्याखालोखाल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सुनील दामोधर काकडे हे प्रभाग 11 मधून 494 च्या मताधिक्याने तर प्रभाग 12 मधून भाजपचे सागर शशिकांत फडके हे 436 मतांनी विजयी झाले. तर सर्वात कमी म्हणजे 2 मतांनी प्रभाग 9 मधून संतोष शरद जाधव व प्रभाग 5 मधून सलमाबी अन्वर कुरेशी विजयी झाले.

YouTube video player

नगरसेवकपदाचे प्रभाग निहाय उमेदवार, पक्ष व मिळालेली मते – प्रभाग 1 अ- अनुसूचित जाती- राजेंद्र मुरलीधर मगर (राष्ट्रवादी अजित पवार)- 381, विनायक रोहिदास मोहिते (भाजप)-653 (विजयी) अमोल अशोक हिवाळे (अपक्ष)-558, नोटा- 24, प्रभाग 1 ब – सर्वसाधारण महिला- गंगुबाई अशोक आधाट (शिवसेना शिंदे)- 444, निर्मला सतीश लांडे (भाजप)- 325, ज्योती ज्ञानेश्वर लिंगे (राष्ट्रवादी अजित पवार)- 741 (विजयी) नोटा- 18, प्रभाग 2 अ –

नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला- शिवानी रोहित काथवटे (शिवसेना शिंदे)- 770 (विजयी) सुमन ईश्वर गुणवंत (राष्ट्रवादी अजित पवार)- 250, नंदा अशोक डाके (राष्ट्रवादी शरद पवार)- 257,कुंदा गोरख रांधवणे (भाजप)- 574,नोटा- 11, प्रभाग 2 ब – सर्वसाधारण – अमर बाबासाहेब जाधव (शिवसेना शिंदे)- 515, अनिकेत मोहनराव डाके (राष्ट्रवादी अजित पवार)- 339, नितीन सुनील दहिवाळकर (भाजप)- 735 (विजयी), संजय भगवान नांगरे (शिवसेना ठाकरे)- 09, सुमित सुधीर बाबर (इंदिरा काँग्रेस)-67, योगेश महेंद्र मुळे (राष्ट्रवादी शरद पवार)- 190, नोटा- 07, प्रभाग 3 अ -नागरीकांचा मागास प्रवर्ग – प्रताप मुकुंदराव फडके (शिवसेना शिंदे)- 910, सुरेश रोहिदास लांडे (भाजप)- 155, रिजवान छोटूभाई शेख (राष्ट्रवादी शरद पवार)-951 (विजयी) वासिम खलील शेख (अपक्ष)-175, सोमनाथ उत्तम शेलार (राष्ट्रवादी अजित पवार)- 305,नोटा- 06,प्रभाग 3 ब-सर्वसाधारण महिला – दिपाली किरण काथवटे (भाजप)- 532, इमामबी इब्राहिम खान पठाण (अपक्ष)- 643,उज्वला नंदकुमार मुंडे (राष्ट्रवादी शरद पवार)- 710 (विजयी), आसमा युसुफ शेख (भारतीय कम्युनिस्ट पक्ष)- 76,नाजनीन उमर शेख (राष्ट्रवादी अजित पवार)- 515, नोटा- 25, प्रभाग 4 अ-सर्वसाधारण महिला – वैष्णवी वैभव देहाडराय (शिवसेना शिंदे)- 319, दिपाली प्रीतम नाईक (अपक्ष)-304, सविता वैभव रोडी (राष्ट्रवादी शरद पवार)- 394,गीता निरज लांडे (भाजप)-754 (विजयी) नोटा- 16, प्रभाग 4 ब – सर्वसाधारण- नवनाथ वामन कवडे (राष्ट्रवादी अजित पवार)- 183, खालेद गाजिमिया काझी (राष्ट्रवादी शरद पवार)-304, समद अहमद काझी (अपक्ष)-42, आशुतोष दत्तात्रय डहाळे (शिवसेना शिंदे)- 759 (विजयी) प्रकाश राजकुमार लड्डा (भाजप)491 , नोटा- 8 प्रभाग 5 अ-अनुसूचित जाती – कैलास भाऊराव तिजोरे (राष्ट्रवादी अजित पवार)- 811 (विजयी), निरंजन माणिक बोरुडे (राष्ट्रवादी शरद पवार)-282, ज्योती अविनाश मातंग (अपक्ष शिवसेना शिंदे पुरस्कृत)-28, राहुल अशोक सावंत (भाजप)-553, नोटा- 07, प्रभाग 5 ब -सर्वसाधारण महिला – सलामबी अन्वर कुरेशी (राष्ट्रवादी अजित पवार)- 631 (विजयी), कल्पना अमोल घोलप (शिवसेना शिंदे)-120, शमसादबी कय्युमखान पठाण (राष्ट्रवादी शरद पवार)-336, जयश्री राहुल मालुसरे (भाजप)- 629 नोटा- 12 ,प्रभाग 6 अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग- बापू नामदेव धनवडे (भाजप)- 617 ,विजय रामभाऊ धनवडे (राष्ट्रवादी अजित पवार)-197, अमर दिलीपराव पुरनाळे (शिवसेना शिंदे)- 871 (विजयी),नोटा-18, प्रभाग 6 ब-सर्वसाधारण महिला – रेखा अंकुश कुसळकर (शिवसेना शिंदे )-574, दीप्ती कमलेश गांधी (भाजप)- 706 (विजयी) वैशाली सोमनाथ दारकुंडे (राष्ट्रवादी अजित पवार)- 260,ज्योती संजीव बडधे (राष्ट्रवादी शरद पवार)- 141,नोटा-21 प्रभाग 7 अ -सर्वसाधारण महिला- माया प्रेम अंधारे (शिवसेना शिंदे)- 418,रेणुका अभिनव अंधारे (भाजप)- 145,सोनल शरद जोशी (राष्ट्रवादी शरद पवार)-588, परविन अमर शेख (राष्ट्रवादी अजित पवार)-730 (विजयी) सायरा तुफेल शेख (अपक्ष)-218 नोटा- 20 प्रभाग 7 ब-सर्वसाधारण- आयुब सरदार पठाण (शिवसेना ठाकरे)-50, वजीर बाबूलाल पठाण (राष्ट्रवादी शरद पवार)- 820 (विजयी) सुरेश सखाराम मामडे (शिवसेना शिंदे)-334, अजिंक्य अरुणराव लांडे (राष्ट्रवादी अजित पवार)-782, राहुल अनिल वरे (भाजप)- 104,नोटा-27, प्रभाग 8 अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग- अमोल बाबासाहेब दाते (अपक्ष)- 146,किरण अशोक पवार (भाजप)- 541, इंदुबाई भगवान म्हस्के (वंचित बहुजन आघाडी)- 436, निलेश फुलचंद रोकडे (राष्ट्रवादी अजित पवार)-1110 (विजयी) रत्नमाला तात्यासाहेब लांडे (अपक्ष)- 200 नोटा-18, प्रभाग 8 ब-सर्वसाधारण महिला- सुनिता किसन चव्हाण (वंचित बहुजन आघाडी)- 525, शिवकन्या बाबुराव देशमुख (भाजप)-713, साधना बाबासाहेब लांडे (राष्ट्रवादी अजित पवार)- 1157 (विजयी) नोटा- 55,प्रभाग 9 अ-अनुसूचित जाती महिला- कमल शहादेव नरवडे (राष्ट्रवादी शरद पवार)- 259, चंद्रकला अविनाश मगरे (शिवसेना ठाकरे)- 144, सुवर्णा राहुल मगरे (राष्ट्रवादी अजित पवार)- 542 (विजयी),सुजाता अनिल वडागळे (भाजप)-454, रेखा नंदकिशोर वाघमारे (शिवसेना शिंदे)- 456 नोटा- 22. प्रभाग 9 ब- सर्वसाधारण- चंद्रकांत आसाराम इथापे (शिवसेना शिंदे)- 333, कानिफनाथ जालिंदर कर्डिले (शिवसेना ठाकरे)-129, सावळेराम अण्णासाहेब कुसळकर (अपक्ष)- 185,संतोष शरद जाधव (राष्ट्रवादी अजित पवार)-500 (विजयी) प्रशांत दिलीप म्हस्के (राष्ट्रवादी शरद पवार)- 214, गणेश एकनाथ सागडे (भाजप)- 498 नोटा-17. प्रभाग 10 अ- अनुसूचित जाती महिला – सोनम सचिन आदमाने (भाजप)- 412,तृषा प्रवीण भारस्कर (राष्ट्रवादी अजित पवार)-1092 (विजयी), मैनाबाई आप्पासाहेब मगर (राष्ट्रवादी शरद पवार)-324, नोटा08, प्रभाग 10 ब-सर्वसाधारण- फिरोज निजाम पटेल (इंदिरा काँग्रेस)- 41, सिराजोद्दीन बापूजी पटेल (राष्ट्रवादी अजित पवार)- 1016 (विजयी), अजय उत्तम भारस्कर (भाजप) – 541, विश्वास गजानन मोहिते (अपक्ष)-20, शब्बीर कासम शेख (राष्ट्रवादी शरद पवार)- 204, नोटा-14 प्रभाग 11 अ- सर्वसाधारण महिला- मंदाकिनी अण्णासाहेब अकोलकर (अपक्ष)- 96, सविता संजय फडके (भाजप)- 1500 (विजयी),हिराबाई संदीप वीर (राष्ट्रवादी शरद पवार)- 573, पंकजा एकनाथ साबळे (राष्ट्रवादी अजित पवार)- 300, नोटा- 23,प्रभाग 11 ब-सर्वसाधारण- जगदीश मच्छिंद्रनाथ आरेकर (राष्ट्रवादी अजित पवार)- 150, सुनील दामोदर काकडे (राष्ट्रवादी शरद पवार)- 1409 (विजयी) गणेश चंद्रभान कोरडे (भाजप)- 915 , नोटा- 18, प्रभाग 12 अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग- आशा खंडेराव बुलबुले (भाजप)-1301 (विजयी), हुसेना अली सय्यद (राष्ट्रवादी शरद पवार)-1190 नोटा-56, प्रभाग 12 ब-सर्वसाधारण- सागर शशिकांत फडके (भाजप)- 1195 (विजयी), शामसुंदर भारदे (राष्ट्रवादी शरद पवार)- 756 ,अरबाज शफिक शेख (राष्ट्रवादी अजित पवार)- 525, सौरभ भाऊसाहेब क्षीरसागर (शिवसेना शिंदे)- 65, नोटा-65.

मतमोजणीस सकाळी 10 वाजता सुरुवात झाली. प्रथम टपाली मतदान मोजण्यात आले, त्यानंतर फेरीनिहाय यंत्रातील मतांची मोजणी झाली. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सर्व निकाल जाहीर झाले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष दळवी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजया घाडगे, तहसीलदार आकाश दहाडदे, गटविकास अधिकारी सोनल शहा उपस्थित होते.

नात्यागोत्याच्या राजकारणाला चपराक
भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी माया अरुण मुंडे व सुजाता सागर फडके या इच्छुक होत्या, मात्र आमदार मोनिका राजळे यांनी नगराध्यक्षपदासाठी जवळचे नातेवाईक रत्नमाला महेश फलके यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांनी अगदी अखेरच्या क्षणी पत्नी माया मुंडे यांना शिवसेना शिंदे पक्षाची उमेदवारी घेतली. नगरसेवकांच्या 24 पैकी फक्त 14 जागांवर शिवसेनेचे उमेदवार होते, तरीही नगराध्यक्षपद खेचून घेत मुंडे यांनी बाजी मारली, तर भाजपच्या उमेदवार तिसर्‍या क्रमांकावर गेले. या निकालामुळे भाजपच्या नात्यागोत्याच्या राजकारणाला चांगलीच चपराक बसली.

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...