Wednesday, May 21, 2025
Homeनगरशेवगाव नगरपरिषदेने नवीन हायमॅक्स बसवण्याचा खुलासा द्यावा

शेवगाव नगरपरिषदेने नवीन हायमॅक्स बसवण्याचा खुलासा द्यावा

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

- Advertisement -

शेवगाव शहरात आंतर्गत रस्ते, भूमिगत गटारे, सीसीटीव्ही, वृक्षारोपण, अग्निशामक यंत्रणा, सार्वजनिक स्वच्छता, पाणी पुरवठा अशा नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा अभाव असतांना त्याकडे दुर्लक्ष करुन आजच्या स्थितीत आवश्यकता नसणार्‍या, लक्षावधी रुपये खर्चाच्या , कोणाचीही मागणी नसणार्या तब्बल 11 हाय मॅक्सची उभारणी केली आहे. निधी ची योग्य विनिमय होत नसल्याने याचा खुलासा करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. नीरज लांडे यांनी नगरपरिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी यांचेकडे केली आहे.

निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री व पालकमंत्री यांना पाठवून या कामातून नगरपरिषदेने नेमका कोणाचा विकास साधला जाणार असा प्रश्न केला आहे. निवेदनात नगरपरिषदेने नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत प्राधान्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

शेवगाव शहराची वाढती लोकसंख्या व वाढता भौगोलिक विस्तार लक्षात घेता शहराच्या विविध भागात पक्के रस्ते, बंदिस्त गटारी, सार्वजनिक स्वच्छतेसाठी घंटागाडी, पिण्याचे पाणी, वृक्ष लागवड अशा विविध मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी ऐरणीवर मांडल्या आहेत.

शेवगावकरांना चौदा पंधरा दिवसातून नळाचे पाणी सोडले जाते, सार्वजनिक स्वच्छतेसाठी अनेक प्रभागात महिनोनमहिने गल्ली गोळापर्यंत घंटागाडी पोहोचत नाही, अनेक भागात विजेचे खांब उभे आहेत त्यांवर ट्युबच लावलेल्या नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. तसेच शेवगाव नगरपरिषदेडे स्वतःच्या मालकीची अग्निशामण गाडी नाही. या सर्व मुलभूत सोयीसाठी नागरिकाकडून कर वसूल केला जातो. त्या सुविधा मात्र पुरविल्या जात नाहीत. हाय मॅक्स बसवण्याच्या कामाची गरज सतानाही हा खर्च करण्याची आवश्यकता नव्हती.

सीसीटिव्हीची निकड

मध्यंतरी शेवगावात घडलेल्या दूर्घटने नंतर शहरात सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची मोठी निकड भासली. त्यावेळी आलेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी नगरपरिषदेला सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना देवूनही नगर परिषदेने त्यांकडे दूर्लक्ष केले. मात्र गरज नसणार्‍या हायमॅक्स च्या कामातुन नेमका कोणाचा विकास साधला? असा प्रश्न डॉ. लांडे यांनी उपस्थित केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Fire News : मुंबई-नाशिक महामार्गावरील जिंदाल कंपनीला भीषण आग; जीवितहानी...

0
इगतपुरी | वार्ताहर | Igatpuri मुंबई-नाशिक महामार्गावरील (Mumbai Nashik Highway) मुंढेगाव शिवारात (Mundhegaon Area) असलेल्या जिंदाल पॉलीफिल्मस कंपनीच्या (Jindal Company) परिसरात मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास...