Saturday, July 27, 2024
Homeनगरशेवगावच्या 29 एसटी बस शिर्डीला शासनाच्या दारी

शेवगावच्या 29 एसटी बस शिर्डीला शासनाच्या दारी

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

राज्य शासनाच्या बहुप्रतिक्षित शासन आपल्या दारी उपक्रमासाठी शेवगाव आगारातून 53 पैकी तब्बल 44 बस गाड्या शिर्डी येथे गेल्याने उर्वरीत अवघ्या 24 एसटी गाड्यांवर संपूर्ण तालुक्याचा भार होता. यामुळे गुरुवारी (दि.17) विद्यार्थ्यांसह प्रवाशांना प्रंचड हाल होऊन मनस्ताप सहन करावी लागला.

- Advertisement -

शेवगाव आगाराकडे सध्या एकूण 53 बस गाड्या उपलब्ध आहेत. दिवसभरात लांब पल्ल्यासह तालुक्याच्या ग्रामीण परिसरात जवळपास 300 फेर्‍या सुरू आहेत. शिर्डी येथील शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी मोठ्या संख्येने बस गाड्या आरक्षित केल्याने मराठवाड्यातील गेवराई आगारातून सुमारे पंधरा बस गाड्या उपलब्ध झाल्या. शासन आपल्या दारी उपक्रम उपक्रमासाठी शेवगाव आगारातून 29 व गेवराई येथून आलेल्या 15 अशा एकूण 44 बस गाड्या कार्यक्रमासाठी गेल्याने शेवगाव आगाराला 24 बस गाड्या द्वारे दिवसभरच्या वेळापत्रकांचा अवलंब करावा लागला.

शेवगाव आगारातून तालुक्याच्या ग्रामीण परिसरात मुक्कामी जाणार्‍या 18 बस गाड्या बुधवारी मुक्कामी गेल्याच नाहीत. तर दररोज सकाळी शाळकरी मुलांना घेण्यासाठी आगारातून ग्रामीण परिसरात जाणार्‍या 15 बस गाड्या आज गेल्या नाहीत त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला. अनेकांना खाजगी रिक्षा बस गाड्यांतून पैसे मोजून यावे लागले अशी खंत अनेक विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली.

अहमदनगर, नेवासा, पाथर्डी, पैठण अशा विविध सेटल सेवा सुरळीत सुरू असल्याने अनेकांनी या सटल सेवेचा लाभ घेतला. पंरतु बस आगारातून आजच्या विस्कळीत सेवेबाबत ग्रामीण परिसरातील प्रवाशांना आगाऊ माहिती दिल्याने अनेकांनी शेवगावी येण्याचे टाळले. त्यामुळे आज दिवसभर शुकशुकाट पाहण्यास मिळाले अधून मधून एखादी बस आली तर त्यामागे पळताना अनेकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले.

खासगी वाहतुकदारांकडून लूटमार

दिवसभर आगारातील बससेवेचे वेळापत्रक कोलमडल्याने अनेक प्रवाशांना खाजगी वाहतुकीचा पर्याय शोधावा लागला. याचा गैरफायदा घेत खासगी वाहतुकदारांनी दुप्पट ते चौपट भाडे प्रवाशांकडून वसूल केले. यासह त्यांची अरेरावी सहन करावी लागली.

- Advertisment -

ताज्या बातम्या