Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजShikhar Dhawan : शिखर धवनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

Shikhar Dhawan : शिखर धवनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

मुंबई | Mumbai

भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज तसेच गब्बर या टोपणनावाने प्रसिध्द असलेल्या शिखर धवनने (Shikhar Dhawan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कसोटी, वनडे आणि टी २० फॉरमॅटमधून निवृत्ती (Retirement) घेतली आहे. सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे. शिखर धवनने ही घोषणा केल्यानंतर त्याच्या फॅन्सला मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : पुण्यात भर पावसात शरद पवारांच्या नेतृत्वात मविआचे आंदोलन; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

शिखर धवनने २०२२ मध्ये बांगलादेशविरूध्द (Bangladesh) अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला नाही. शिखर धवनने निवृत्तीचा व्हिडिओ शेअर करत म्हटले की, मी माझा क्रिकेटचा प्रवास येथेच संपवत आहे. मी माझ्यासोबत अनेक आठवणी घेऊन जात आहे. शिखरने २०१० मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धचा एकदिवसीय क्रिकेट सामन्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर २०११ मध्ये श्रीलंकेविरुद्ध टी २० सामन्याने टी २० मध्ये पदार्पण केले होते.

तसेच २०१३ मध्ये त्याने कसोटी क्रिकेट (Test Cricket) सामन्यात पदार्पण केले होते. शिखर धवनने भारताकडून ३४ कसोटी क्रिकेट सामने खेळले असून ४०.६१ च्या सरासरीने २३१५ धावा केल्या आहेत. तर १६७ वनडे क्रिकेट सामन्यात ४४.११ च्या सरासरीने ७४३६ धावा केल्या आहेत. तसेच त्याने टी २० क्रिकेटमध्ये ६८ सामने खेळले असून १७५९ धावा केल्या आहेत. शिखर धवनने आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज संघाचे कर्णधारपद भूषविले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या