Monday, July 22, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेनेच्या निवडणूक चिन्हाची लढाई; शरद पवार म्हणाले, “निवडणूक आयोगाचा निर्णय…”

शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाची लढाई; शरद पवार म्हणाले, “निवडणूक आयोगाचा निर्णय…”

मुंबई | Mumbai

- Advertisement -

शिवसेना (Shivsena) पक्ष कोणाचा, निवडणूक चिन्हं कोणाचे (Shivsena Election Symbol)याचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Election Commission Of India) पोहचला आहे. दरम्यान, याबाबत आता राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रथमच भाष्य केले आहे.

शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाने पुरावे मागितले आहेत. यासंदर्भात काय सांगाल? असा प्रश्न शरद पवार यांना पत्रकारांनी विचारला. यावर पवारांनी, “मला काही सांगायचं कारण नाही. निवडणूक आयोग यासंदर्भात निकाल देईल,” असं उत्तर दिलं. तसेच पुढे त्यांनी “निवडणूक आयोगाचा निर्णय जो काही असेल तो कुठल्याही राजकीय पक्षाला मान्य करावा लागेल,” असंही सांगितलं.

दरम्यान महाराष्ट्राच्या नजरा आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लागल्यात. कारण धनुष्य बाण चिन्ह उद्धव ठाकरे गटाला द्यायचं की, एकनाथ शिंदे गटाला याचा फैसला निवडणूक आयोग करणार आहे. येत्या ३ नोव्हेंबरला अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीत धनुष्य बाण चिन्ह मिळावे, अशी मागणी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगानं शिंदे गटाच्या या मागणीचं पत्र ठाकरे गटाला ईमेलवरून पाठवले आहे. यासंदर्भात ८ ऑक्टोबरला दुपारी २ वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडा, असे आदेश निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला दिले आहे. या मुदतीत उत्तर दिले नाही तर निवडणूक आयोग योग्य ती कार्यवाही करेल, असा इशाराही आयोगाने दिला आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाने पुन्हा एकदा लेखी पत्राद्वारे मुदतीची मागणी केली आहे. त्यामुळे आता काय होणार याची उत्सुकता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या