Saturday, July 27, 2024
Homeनाशिकशिंदे गटाचे नाशकातून १८ हजार शिवसैनिक जाणार

शिंदे गटाचे नाशकातून १८ हजार शिवसैनिक जाणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुंबईतील दसरा मेळाव्याबाबत (Dasara Melava) शिवसेनेसोबतच (Shivsena) शिंदे गटाची जोरदार तयारी सूरू असून शहर व जिल्हाभरातून सुमारे १८ हजार शिवसैनिक (Shivsainik) जाणार असल्याचे महानगरप्रमुख बंटी तिदमे (Bunty Tidme) यांनी सांगितले…

- Advertisement -

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमधून शिवसेनेपाठोपाठं शिंदे गटाच्या सैनिकांनीही दसरा मेळाव्याची जय्यत तयारी केली आहे. शिंदे गटाच्या (Shinde Group)माध्यमातून नाशिक परिसरातून ४३ बसेस व सुमारे ३५० कारच्या माध्यमातून सुमारे १८ हजार शिवसैनिक मुंबईतील मेळाव्याला दाखल होणार असल्याने शिंदे गटात उत्साहाचे वातावरण आहे.

तसेच नाशिक जिल्ह्याच्या जबाबदार्‍यांचे वाटप करण्यात आले असून पेठ परिसराची जबाबदारी भाऊलाल तांबडे, ज्ञानेश्वर भोये पप्पू मोरे यांच्यावर देण्यात आली आहे. तर कळवण परिसराची (Kalwan Area) जबाबदारी भाऊलाल तांबडे यांच्यासह शरद पगार, प्रशात पगार, जितेंद्र पगार यांच्याकडे आहे.

मालेगावची (Malegaon) जबाबदारी संजय दुसाने, मनोहर बच्छाव यांच्याकडे तर नांदगाव, येवला, चांदवड, परिसराची जबाबदारी आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) व फरान खान यांच्यावर देण्यात आली आहे. तर नाशिकची जबाबदारी बंटी तिदमे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईच्या मेळाव्याला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे हात बळकट करण्याचे आवाहन खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) व पालकमंत्री दादा भूसे (Dada Bhuse) यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या