Monday, July 8, 2024
Homeराजकीय'ती' ऑडिओ क्लिप शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला पडली महागात

‘ती’ ऑडिओ क्लिप शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला पडली महागात

पक्षाने केली हाकालपट्टी

मुंबई | Mumbai

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेचे बीडचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे (Kundlik Khande) आणि राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे शिवराज बांगर यांची कथित ऑडिओ क्लिप (Audio clip) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुंडलिक खांडे यांच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना लोकसभा निवडणुकीत मदत केल्याची कबुली दिल्याचा संवाद आहे. बीडमध्ये महायुतीमधील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा अवघ्या सहा हजार मतांनी लोकसभा निवडणुकीत पराभव झाला.

हे देखील वाचा : Majhi Ladki Bahin Yojana : योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

या पराभवाला महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्षांतील नेत्यांनी काम केले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यातच शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख खांडे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यात त्यांनी आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा पंकजा मुंडे यांना धोका दिल्याचे म्हटले आहे.त्यामुळे महायुतीत मोठे वादळ निर्माण झाले आहे.त्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेने (Shivsena) पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या संदर्भात शिवसेना सचिव संजय मोरे यांनी पत्रक काढले आहे.

हे देखील वाचा : ज्येष्ठ नागरिकांना सरकार घडवणार देवदर्शन; मुख्यमंत्री शिंदेंनी केली ‘या’ योजनेची घोषणा

तसेच आपल्याच पक्षाच्या उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला (Attack) केल्याच्या प्रकरणात शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.तर संबधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते. यानंतर बीड शहरातील जालना रोडवर असलेले खांडे यांचे कार्यालय जमावाने दगडफेक करुन फोडले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या