Friday, April 25, 2025
Homeनगरशिर्डी विमानतळ परिसरात लेझर प्रकाश किरण वापरास बंदी

शिर्डी विमानतळ परिसरात लेझर प्रकाश किरण वापरास बंदी

राहाता |प्रतिनिधी| Rahata

शिर्डी विमानतळाच्या (Shirdi Airport) 25 किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण (Laser Light) आकाशात सोडण्यास बंदी (Ban) घालण्याचे आदेश प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी जारी केले आहेत. शिर्डी विमानतळावर दिवसा व रात्री वेगवेगळ्या विमान (Plane) कंपन्यांची विमाने व हेलिकॉप्टर (Helicopter) उतरत असतात आणि उड्डाण करीत असतात. रात्रीच्यावेळी वैमानिकांना दिशा आणि ठिकाण निश्चित करण्यासाठी धावपट्टीवर आणि हवाई वाहतूक नियत्रंण टॉवरद्वारे लाईटचा उपयोग केला जातो.

- Advertisement -

शिर्डी विमानतळ परिसरातील 25 किलोमीटर परिघात उच्च शक्तीच्या लेझरमुळे (Laser Light) वैमानिकांचे लक्ष विचलित होणे आणि संभाव्य अक्षमतेमुळे विमानाच्या कार्यप्रणालीत गंभीर अडथळे येऊ शकतात. उड्डाण आणि लँडिंगच्या महत्वाच्या टप्प्यामध्ये अशा कृती विमानतळ परिसराच्या आसपास झाल्यास विमान वाहतुकीला अधिक धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा विमान वाहतूकीला अडथळा येऊ नये, कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये आदेश जारी करण्यात आले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...