Saturday, May 18, 2024
Homeनगरशिर्डी शहर भाजपची 35 जणांची कार्यकारिणी जाहीर

शिर्डी शहर भाजपची 35 जणांची कार्यकारिणी जाहीर

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

भारतीय जनता पार्टीच्या शिर्डी शहर कार्यकारणीत सर्व नव्या-जुन्या घटकांचा मेळ बसवत समाजातील सर्व घटकांचा समावेश करण्यात आला असून

- Advertisement -

भाजपची ध्येयधोरणे समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावा, अशा नवनियुक्त पस्तीस पदाधिकार्‍यांना आ. राधाकृष्ण विखे पाटील तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी शुभेच्छा दिल्या.

शिर्डी शहर भाजपची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून यामध्ये उपाध्यपदी रवींद्र गोंदकर, सुधीर शिंदे, विकास कोते, दिपक वारुळे, बालचंद ओस्तवाल अशा 5 जणांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे संघटन सरचिटणीस म्हणून विनोद संकलेचा, 3 सरचिटणीसपदी जयंती पटेल, भाऊसाहेब भोसले, विनायक रत्नपारखी, 5 सचिवपदी किरण बर्डे, संपत जाधव, रावसाहेब शेळके, दिपक गायके, किरण सोनवणे, 5 संघटकपदी राजेंद्र हरिभाऊ गोंदकर, दादासाहेब काळे, बापू ठाकरे, श्याम कोते, सचिन गायकवाड, कोषाध्यक्षपदी कैलास वारुळे, प्रसिध्दी प्रमुख पंडित गुडे, सह प्रसिद्धी प्रमुख गफ्फारखान पठाण, सोशल मीडिया प्रमुख राहुल घुले, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष सचिन सोनवणे, महिला मोर्चा शहराध्यक्ष रंजना सावंत तर कार्यकारिणी सदस्य म्हणून बाळासाहेब काटकर, ज्ञानेश्वर लांबोळे, वसंत गोंदकर, राजेश टिकयाणी, सुभाष यादगुडे, सचिन तनपुरे, दिनेश कुलकर्णी, सुलेमान सैय्यद, नानासाहेब बनकर, अशोक वाघ, साईराम गुजर, संजय बेलदार, सुनील सोनवणे, हरिष प्रेमाणी, महेबुब शेख आदी पस्तीस पदाधिकार्‍यांचा समावेश आहे.

यावेळी रंजना संजय सावंत यांची भारतीय जनता पार्टी शिर्डी शहर महिलाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी निवडीचे स्वागत केले. तसेच जिल्हाध्यक्ष राजेेंंद्र गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार ,शिर्डी शहराध्यक्ष सचिन शिंदे व सर्व भाजपा पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या