Monday, June 9, 2025
Homeक्राईमCrime News : कानशिलात थापड मारल्यानं पेव्हर ब्लॉकवर पडून एक ठार

Crime News : कानशिलात थापड मारल्यानं पेव्हर ब्लॉकवर पडून एक ठार

शिर्डी येथील घटना || तीन आरोपी ताब्यात

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

- Advertisement -

शहरातील नगर-मनमाड महामार्गावरील खंडोबा कॉम्प्लेक्स लगत मध्यरात्री झोपलेल्या व्यक्तीच्या खिशातून पाकीट चोरल्यानंतर चोरट्यांनी त्या व्यक्तीच्या कानशिलात जोरदार चापट मारल्याने ती व्यक्ती पेव्हर ब्लॉक वर पडून जखमी झाला व तेथे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही धटना शिर्डी शहरात रविवारी रात्री घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती खंडोबा कॉम्प्लेक्सच्या बंद असलेल्या दुकानांसमोर झोपलेली होती. त्याचवेळी तिघेजण तिथे आले आणि त्याच्या खिशात हात घालून सदर व्यक्तीचे पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. झोपेतून जागा झाल्यावर त्या अज्ञात व्यक्तीने त्यांना विरोध केला. यामुळे त्यांच्यात झटापट सुरू झाली. एका आरोपीने त्याच्या कानशिलात जोरदार थप्पड मारली. त्यामुळे तो जमिनीवर पडून बेशुद्ध झाला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. हा सर्व प्रकार मध्यरात्री घडला असून रात्री गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे व गस्तीपथकातील पोलिसांना खंडोबा मंदिरा जवळ हमसफर ट्रॅव्हल्स ऑफिसच्या समोर अंदाजे 45 वर्षीय एक अनोळखी पुरुष पेव्हर ब्लॉक वर पडलेला दिसला. त्याची पाहणी करता तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता.

त्या व्यक्तीस उपचारार्थ साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात दाखल केल्या असता डॉक्टरांनी तो मृत असल्याचे घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाजवळ सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन व्यक्ती त्याच्याजवळ येऊन त्याचे खिशातील पाकीट काढून घेताना दिसत होते त्यांचेंमध्ये भांडण व झोंबा झोंबी झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत आरोपी किरण नंदकुमार काळे रा.नांदुर-शिंगोटे, विजय राजू जाधव रा. निमगाव व ऋषिकेश शिवाजी अंधारे रा.गंगापूर यांनी हा गुन्हा केल्याचे उघड झाले. त्यानुसार आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 105 309 (4) 3 (5) अन्वये शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दीड वर्षांपासून सहा पंचायत समित्यांना बीडीओंची प्रतिक्षा!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीयदृष्ट्या जागृत असणार्‍या अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या दीड ते दोन वर्षापासून सहा पंचायत समितीमध्ये प्रभारी राज आहे. या ठिकाणी गटविकास अधिकारी पद रिक्त...