Tuesday, January 6, 2026
Homeनगरशिर्डी नगरपरिषदेवर भाजप-महायुतीचा झेंडा; सौ. जयश्री थोरात नगराध्यक्षपदी, विखे पाटलांचे वर्चस्व कायम

शिर्डी नगरपरिषदेवर भाजप-महायुतीचा झेंडा; सौ. जयश्री थोरात नगराध्यक्षपदी, विखे पाटलांचे वर्चस्व कायम

शिर्डी । प्रतिनिधी

तीर्थक्षेत्र शिर्डी नगरपरिषदेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्याचे महसूल व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. या विजयामुळे शिर्डी नगरपरिषदेवर पुन्हा एकदा ‘विखे’ ब्रँडची मोहोर उमटली असून नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपच्या उमेदवार जयश्री विष्णू थोरात यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला.

- Advertisement -

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण 25,263 वैध मते पडली होती. जयश्री विष्णू थोरात यांनी तब्बल 12,610 मते मिळवून विजयाचे शिखर गाठले. त्यांनी अपक्ष उमेदवार कल्याणी विठ्ठल आरणे (7,670 मते) आणि अनिता सुरेश आरणे (1,844 मते) यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पराभूत उमेदवार: मेघना ज्ञानेश्वर खंडीझोड (378 मते), सायली दिगंबर मोरे (455 मते), माधुरी अविनाश शेजवळ (1,684 मते) आणि भाग्यश्री सुयोग सावकारे (452 मते).नोटा : 170 मतदारांनी कोणासही पसंती दिली नाही.

YouTube video player

विखे पाटील पिता-पुत्रांच्या व्यूहरचनेमुळे शिर्डी नगरपरिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून, अनेक प्रभागांत विरोधकांचा पराभव झाला आहे. प्रभाग 1 ते 4: भाजप आणि शिवसेनेची पकड ठेवली.
प्रभाग 1ः जागा अ मध्ये भाजपच्या त्रिभुवन सुनिता मंगेश (1235 मते) यांनी आरणे अनिता सुरेश (1219 मते) यांचा पराभव केला. जागा ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कोते निलेश मुकुंदराव (1341 मते) विजयी झाले असून त्यांनी शेळके प्रतिक राजेंद्र (996 मते) यांचा पराभव केला.
प्रभाग 2: जागा अ मध्ये अपक्ष गोंदकर सतीश गोविंदराव (1337 मते) विजयी झाले. जागा ब मध्ये शिवसेनेच्या गोंदकर सुनिता वसंत (1441 मते) यांनी बाजी मारली.
प्रभाग 3: या प्रभागात शिवसेनेचे वर्चस्व राहिले. जागा अ मध्ये ठाकरे बापु पांडुरंग (1190 मते) आणि जागा ब मध्ये कोते आशाबाई कमलाकर (1264 मते) यांनी विजय मिळवला.
प्रभाग 4: जागा अ मध्ये भाजपच्या बर्डे गायत्री राजेंद्र (1551 मते) आणि जागा ब मध्ये कोते नितीन उत्तमराव (947 मते) विजयी झाले.
प्रभाग 5 ते 8: भाजपची विजयी घौडदौड राहिली. प्रभाग 5: भाजपच्या विद्या श्याम जाधव (शेजवळ) (1045 मते) आणि शेळके अभय दत्तात्रय (1374 मते) यांनी विजय संपादन केला.
प्रभाग 6: जागा अ मध्ये भाजपचे गायकवाड सचिन सिताराम (688 मते) विजयी झाले. जागा ब मध्ये बोर्‍हाडे कोमल किरण (618 मते) यांनी कोते वर्षा विशाल (540 मते) यांचा पराभव केला.
प्रभाग 7: येथे अपक्षांनी मुसंडी मारली. सोनवणे सरिता गणेश (823 मते) आणि शेळके अमित कैलास (829 मते) हे अपक्ष उमेदवार विजयी झाले.
प्रभाग 8: भाजपचे गोंदकर रविंद्र पांडुरंग (1275 मते) यांनी सय्यद महेमुद दिलदार (922 मते) यांचा पराभव केला.
प्रभाग 9: राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रभाग राखला. गोतीस अलका वाल्मिक (2057 मते) आणि गोंदकर दिपक रमेश (2095 मते) हे विजयी झाले.
प्रभाग 10: भाजपच्या कोते वैशाली दत्तात्रय (1474 मते) आणि कोते नितीन पाराजी (860 मते) यांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले.
प्रभाग 11: भाजपच्या शिंदे छाया सुधीर (1955 मते), कोते अरविंद सुखदेव (2740 मते) आणि कोते प्रतिक्षा किरण (3364 मते) यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी 21 डिसेंबर 2025 रोजी हे निकाल जाहीर केले. या विजयामुळे नगरपरिषदेच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्याकडे आल्या आहेत. विकास कामांचा अजेंडा आणि मजबूत संघटन ही भाजपच्या या मोठ्या यशाची प्रमुख कारणे मानली जात आहेत. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी साईनगरीत गुलाल उधळत आणि फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

ताज्या बातम्या

Nashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; दोन माजी महापौर करणार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) धामधुमीत शहरात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजपमध्ये (BJP) असलेले नाशिकचे दोन माजी...