शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शहरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (LCB) काही पानटपरीवर अचानक टाकलेल्या धाडीत दोन आरोपींना जेरबंद (Accused Arrested) करत सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला. यामध्ये सुगंधी तंबाखू, विमल आणि इतर कंपनीच्या गुटख्याचा समावेश आहे. वास्तविक महाराष्ट्रात गुटखाबंदी कायदा अंमलात असूनही गुटखा विक्री करताना सापडल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे. तरीसुध्दा काही बहाद्दर या कायद्याला न जुमानता हा गुटखा तस्करीचा (Gutkha Smuggling) व्यवसाय करत आहे. शिर्डीत नगर येथील पोलिसांनी (Shirdi Nagar Police) केलेल्या कारवाईत फहाद ताहीरहसन अन्सारी व शोयब ताहीरहसन अन्सारी हे दोन भाऊ गुटखा तस्करी करताना पकडले. हे जरी शिर्डीत वास्तव्यास असले तरी हे मूळचे उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) आहेत. यांचा हस्तक निकुंज केसरिया हा राजकोट (Rajkot), राजस्थान (Rajasthan) येथून शिर्डीचे गुटख्याचे सूत्र हलवत आहे. हे पोलीस तपासात समोर आले.
शिर्डी शहरात पुन्हा एकदा परप्रांतीय गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांचा अड्डा आहे हे अधोरेखित झाले असून जर नगर येथून येऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस कारवाई करतात तर शिर्डी पोलीस स्टेशनला आजपर्यंत गुटखा तस्करी, विक्री होत आहे हे का समजलं नाही, अशी चर्चा स्थानिक नागरिक करत आहे. शिर्डीत (Shirdi) गुटखा विक्रीचे जाळ खूप मोठे असून यामध्ये अनेक तरुण या व्यसनाच्या आहारी गेले आहे. अनेकांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागते आहे. तरी सुद्धा शिर्डीतील गुटखाकिंग हे परराज्यातील व्यापार्यांना हाताशी धरून हा गोरखधंदा बिनधास्त करत आहेत ही गंभीर बाब आहे. शिर्डी सारख्या तिर्थास्थानी साई कॉम्प्लेक्स, छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स, मंदिर परिसर बाहेर, बसस्टँड, रेल्वेस्टेशन, रस्ते, भिंती इत्यादी ठिकाणी गुटखा खाऊन मारलेल्या पिचकार्या आजही या घटनेच्या साक्षीदार आहेत.
मात्र शिर्डी (Shirdi) गाव अस्वच्छ झालं काय आणि बदनाम झालं काय, याचे कुणालाही देणे-घेणे नाही. कारण याविषयी शिर्डी पोलीस स्टेशनला (Shirdi Police Station) ना कोणते निवेदन, ना कोणता मोर्चा. त्यामुळे शिर्डी पोलीस प्रशासन हे सर्रास होत असलेल्या गुटखा विक्रीचा कारभार उघड्या डोळ्याने बघून सुध्दा झोपल्याचे सोंग घेत आहे हे विशेष. शिर्डी पोलिसांचा ढिसाळ कारभार आणि दुर्लक्ष यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढत असून अनेक गुन्हेगारी स्वरूपाचे तरुण, परप्रांतीय हे बेकायदेशीर दारू विक्री, गांजा (Cannabis), गुटखा (Gutkha), अंमली पदार्थ (Narcotics) विक्री खुलेआम करत असून पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे स्थानिक नागरिक दहशतीखाली वावरत आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांनी शिर्डीत सुरू असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शिर्डीत बाराही महिने अनेक ठिकाणी सर्रासपणे गुटखा विक्री होताना दिसते पोलीस मात्र तुरळक एखादी किंवा दुसरी कारवाई करतात तर यावर कायमचाच पायबंद का नाही? परिसरातील गुटखाकिंग यांच्यावर कारवाई केंव्हा होणार? अशी शिर्डीत (Shirdi) नागरिकांकडून चर्चा केली जात आहे.