Wednesday, February 11, 2026
HomeनगरShirdi : शिर्डी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी सज्ज

Shirdi : शिर्डी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी सज्ज

शिर्डी |प्रतिनिधी|Shirdi

साईबाबांच्या विचारांचा वारसा सांगणार्‍या आणि भक्तीचा महासागर लोटणार्‍या शिर्डी परिक्रमा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 13 फेब्रुवारी रोजी पहाटे होणार्‍या या सोहळ्यासाठी ग्रीन एन क्लीन शिर्डी फाउंडेशन, साईबाबा संस्थान , शिर्डी नगरपरिषद ग्रामस्थ व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदा परिक्रमेत विक्रमी गर्दी होण्याची शक्यता असल्याने शिर्डीकरांनी भक्तांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे.

- Advertisement -

यंदाच्या परिक्रमेचे मुख्य आकर्षण ठरणार आहे मध्यप्रदेश रतलाम येथील भव्य शोभायात्रा असणार आहे. यामध्ये साईबाबांचा सुवर्ण रथ, छत्र, चामर, ध्वज आणि पवित्र चादर सहभागी होणार आहे. याशिवाय इंदूर येथील तांडव नृत्य पथक, केरळमधील पारंपरिक वाद्य पथक आणि डमरू पथक परिक्रमेची शोभा वाढवणार आहेत. स्थानिक नागरिकांचा सहभाग शिर्डी परिसरातील विद्यार्थ्यांची लेझीम आणि पावली पथके, संबळ पथक, विविध चित्ररथ आणि भजनी मंडळी या भक्ती सोहळ्यात रंगत आणणार आहेत.

YouTube video player

भक्तांच्या स्वागतासाठी शिडी नगरी सजली असून संपूर्ण परिक्रमा मार्ग फुलांनी सजवण्यात येणार आहे. मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या आणि स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. ग्रामस्थ स्वतः रस्त्यावर उतरून साईभक्तांचे स्वागत करणार आहेत. शुक्रवारी परिक्रमेच्या दिवशी एकादशी असल्याने भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली आहे. मार्गावर 100 हून अधिक ठिकाणी सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांतर्फे साबुदाणा खिचडी, फळे, चहा-नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

गर्दीच्या नियोजनासाठी ग्रीन एन क्लीन फाउंडेशन आणि पोलीस प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर 500 स्वयंसेवक देखील नियुक्त करण्यात आलेले आहे. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी वॉच टॉवर्स उभारण्यात आले असून ड्रोन कॅमेर्‍यांच्या माध्यमातून आकाशातूनही नजर ठेवली जाणार आहे. परिक्रमा मार्गावर ठिकठिकाणी पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र फिरते शौचालय, प्रथमोपचार केंद्रे आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.

परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर साईबाबा संस्थान विश्वस्तच्या वतीने भाविकांना प्रसाद आणि उदीचे वाटप करण्यात येणार आहे. परिक्रमेचा मुख्य समारोप सोहळा शताब्दी मंडपात पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, सरला बेटाचे मठाधिपती महंग रामगिरी महाराज, महंत काशीकानंद महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या परिक्रमा सोहळ्यसाठी साईबाबा संस्थान, अप्पर जिल्हाधिकारी, शिर्डी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभले आहे. साईभक्तांनी या शिस्तबद्ध आणि भक्तीमय सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रीन एन क्लीन शिर्डी फाउंडेशनचे संयोजक, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी केले आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई

0
पुणे | प्रतिनिधी Pune शहरातील मध्यवर्ती बुधवार पेठेत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह परिमंडळ एकने मध्यरात्रीच्या सुमारास कोम्ंिबग ऑपरेशन राबवले. त्यावेळी कुंटणखान्यातून दोन बांग्लादेशी महिलांना ताब्यात...