Saturday, April 4, 2026
HomeनाशिकNashik News : जिल्ह्यातील वाढत्या विकासकामांसाठी जिल्हा नियोजन निधी वाढवा - मंत्री...

Nashik News : जिल्ह्यातील वाढत्या विकासकामांसाठी जिल्हा नियोजन निधी वाढवा – मंत्री भुजबळांची मुख्यमंत्र्यांसमोर भूमिका

सन २०२६-२७ साठी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत १३३३.९० कोटीची तरतूद करण्याची केली भुजबळ यांनी मागणी

येवला | प्रतिनिधी | Yeola

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन २०२५-२६ साठी ९०० कोटी रुपयांची तरतूद होती. सन २०२६ – २७ साठी ही ६९१.९० कोटी रुपये मर्यादा शासनाने कळवली आहे. म्हणजे पुढील वर्षासाठी २०९ कोटी नियतव्यय कमी करण्यात येणार आहे. मात्र आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचा (Nashik District) निधी कमी करू नये, शासकीय यंत्रणांकडून अधिक ६४२ कोटी इतकी वाढीव निधीची मागणी आहे. त्यानुसार ६९१.९० अधिक ६४२ अशी एकूण १३३३.९० कोटी इतकी तरतूद करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

- Advertisement -

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ चे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा मंत्री, वित्त व नियोजन, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थान येथे नाशिक जिल्ह्याची ऑनलाइन पद्धतीने बैठक पार पडली. या बैठकीस मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) ही उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी मागणी केली.

बैठकी दरम्यान मंत्री भुजबळ यांनी सांगितले की, सन २०२५-२६ या वर्षासाठी नाशिक जिल्हा वार्षिक योजना  अंतर्गत ९०० कोटी इतकी तरतूद करण्यात आली होती. मात्र सन २०२६-२७ साठी प्रस्तावित तरतूद ६९१.९० कोटी इतकी मर्यादा कळवण्यात आली आहे.जिल्ह्याचा वेगाने होत असलेला विकास, नाशिक जिल्ह्यातून मिळणारा सर्वाधिक महसूल,वाढती लोकसंख्या आणि विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या वाढीव मागण्या लक्षात घेता निधी कमी करू नये असे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) पर्यटन वाढीसाठी नाशिक कलाग्राम आणि गंगापूर धरण येथील सी प्लेन बाबत लवकर कार्यवाही करण्याची त्यांनी मागणी केली. तसेच सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील मंजूर निधीचा आढावा घेताना त्यांनी प्रशासनाला निधी खर्चाच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना दिल्या. सर्व योजनांच्या सर्व प्रशासकीय मान्यता तातडीने देण्यात याव्या तसेच मार्च अखेर पर्यंत १००टक्के निधी खर्च होईल याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.

दरम्यान, नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल, अशी अपेक्षा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शाळा खोल्यांची दुरुस्ती आणि वर्गखोल्यांसाठी वाढीव निधीची मागणी केली.



ताज्या बातम्या

Breaking News : दिंडोरीत विहिरीत कार कोसळून नऊ जणांचा मृत्यू; दरगोडे...

0
दिंडोरी | प्रतिनिधी Dindori आज दिनांक ३ एप्रिल २०२६ रात्री दहा वाजेच्या सुमारास दिंडोरी शहरात कार क्रमांक MH15-JS-1053 विहिरीत कोसळली. या अपघातात कार मधील ९...