Tuesday, April 8, 2025
HomeनगरShirdi : शिर्डीत काल्याच्या किर्तनाने रामनवमी उत्सवाची सांगता

Shirdi : शिर्डीत काल्याच्या किर्तनाने रामनवमी उत्सवाची सांगता

उत्सवाच्या दिवशी पावणेदोन लाख भाविकांनी घेतला महाप्रसाद || 3 लाख 72 हजार लाडू पाकिटांची विक्री

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्यावतीने दि. 5 एप्रिलपासून सुरू असलेल्या रामनवमी उत्सवाची सांगता सोमवारी विक्रम महाराज नांदेडकर यांच्या काल्याच्या किर्तनानंतर साईसमाधी मंदिरात दहीहंडी फोडून करण्यात आली. तीन दिवसीय उत्सवात 74 लाख लाडू प्रसाद पाकिटांची विक्री झाली तर पावणेदोन लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याची माहिती साई संस्थानच्यावतीने देण्यात आली.

- Advertisement -

सोमवारी उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे 6.50 वाजता श्रींचे मंगलस्नान व शिर्डी माझे पंढरपूर ही आरती उपमुख्यकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे व त्यांच्या पत्नी वैशाली यांच्याहस्ते करण्यात आली. सकाळी 7 वाजता साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या पत्नी वंदना यांनी रुद्राभिषेक पूजा केली. राम नवमी उत्सवाच्या सांगता दिनी सकाळी 10 वाजता विक्रम महाराज नांदेडकर यांचा गोपाळकाला किर्तनाचा कार्यक्रम पार पडला. गोरटे यांच्या काल्याच्या किर्तनानंतर समाधी मंदिरात साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील होते यांचे वंशज परिवारातील सदस्य पारेश्वर बाबासाहेब कोते यांच्याहस्ते दहीहंडी फोडण्यात आली.यावेळी विक्रम महाराज नांदेडकर यांचा संस्थानच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीप भोसले, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुपारी 12.10 वाजता श्रींची मध्यान्ह आरती झाली. दुपारी 1 ते 3 या वेळेत द गोल्डन व्हॉइस स्टुडिओज मुंबई यांचा साई भजनसंध्या कार्यक्रम दुपारी 3.30 ते 5.30 या वेळेत श्रीमती पुजा राठोर, जयपूर यांचा साई भजन संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उत्सव कालावधीत पार पडलेल्या सर्व कार्यक्रमांना श्रोत्यांकडून प्रतिसाद मिळाला. संस्थानच्यावतीने या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. तर रात्री 10 वाजता शेजारती झाली. रामनवमी उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा प्रधान न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रज्ञा महांडुळे, विश्वनाथ बजाज, मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे, वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश वक, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी तसेच बाबांचे समकालीन भक्तांचे वंशज अमृत गायके, विशाल कोते, राजेंद्र होते, सचिन शिंदे, मिलिंद शेळके व आदी साई भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साईबाबांच्या हयातीपासून सुरू असलेल्या रामनवमी उत्सवाचे यंदाचे 114 वे वर्ष असून या तीन दिवसीय उत्सवात साई संस्थानच्यावतीने देण्यात येणार्‍या साईप्रसादालय, साईआश्रम भक्त निवास, 500 रूम, द्वारावती भक्त निवास आदी ठिकाणी पावणेदोन लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तर 3 लाख 72 हजार 969 लाडू पाकिटांची विक्री झाली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : झेडपीचा मार्चएण्ड सुरूच, जमा-खर्चाच्या हिशोबाची जुळवाजुळवी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मार्च ऍण्ड म्हणजेच 31 मार्च आर्थिक वर्षाचा शेवट उरकण्याची धावपळ अजुनही जिल्हा परिषद सुरू आहे. 2023-24 मध्ये मंजूर 321 कोटींपैकी 30 मार्चअखेर...