Wednesday, January 7, 2026
Homeनगरदक्षिणा पेटीतून लाखोंची रोकड चोरणारा साईसंस्थानचा कर्मचारी गोंदकर याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल

दक्षिणा पेटीतून लाखोंची रोकड चोरणारा साईसंस्थानचा कर्मचारी गोंदकर याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल

शिर्डी (प्रतिनिधी)

साईबाबा संस्थानच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या बाळासाहेब गोंदकर या शिपायाने दक्षिणा पेटीतून लाखो रुपयांची रोकड चोरल्याचे उघडकीस आले आहे. अविनाश विनायक कुलकर्णी, लेखाधिकारी, यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

- Advertisement -

संस्थानच्या माहितीनुसार, एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या दक्षिणा मोजणीच्या सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत हा प्रकार समोर आला. बाळासाहेब नारायण गोंदकर, लेखा विभागातील शिपाई, यांनी ४, ८ आणि ११ एप्रिल रोजी दक्षिणा मोजणीदरम्यान ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल चतुराईने लपवले आणि नंतर ते चोरून नेले. ही चोरी झालेली रक्कम अंदाजे सव्वा ते दीड लाख रुपये दरम्यान असण्याची शक्यता आहे.

YouTube video player

१६ एप्रिल रोजी दक्षिणा मोजणी पूर्ण झाल्यावर नोट मोजणी मशिनमध्ये ४६ हजार ५०० रुपये आणि २५ एप्रिल रोजी ५०० रुपयांचा आणखी एक बंडल (४५ ते ५० हजार रुपये) आढळून आला. या दोन्ही घटना संशयास्पद वाटल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी गोंदकर नोटा लपवताना स्पष्ट दिसले. त्यांनी नोटा मांडीखाली, पॅन्टमध्ये आणि मशीनच्या मागे लपवून नंतर घेऊन गेल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे.

सीईओ गोरक्ष गाडीलकर यांच्या आदेशानुसार, अविनाश कुलकर्णी यांनी गोंदकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संस्थानने गोंदकर याला अगोदरच प्राथमिक माहितीवर निलंबित केले होते. गुरुवारी या संदर्भातील सविस्तर अहवाल प्राप्त होताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून बडतर्फीचीही कारवाई सुरू करण्यात आली आहे. शिर्डी पोलीस घटनेचा अधिक तापस करत आहेत.

ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा – विभागीय आयुक्त...

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करीत पायाभूत सोयीसुविधांसह विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश नाशिक...