Tuesday, March 25, 2025
Homeनगरशिर्डीत 'ते' दहशतवादी नव्हे बनावट सोने विकणारे

शिर्डीत ‘ते’ दहशतवादी नव्हे बनावट सोने विकणारे

स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन्ही आरोपी जेरबंद

राहाता |प्रतिनिधी| Rahata

शिर्डी येथील हॉटेलमध्ये बनावट आधारकार्ड देवून मुक्कामी असलेले 2 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. बनावट आधारकार्ड देवुन संशयीतरित्या वास्तव्य करणारे आरोपींना खडका शिवार, ता. नेवासा येथुन अटक करण्यात आली. हे आरोपी दहशतवादी नसून बनावट सोने खरे असल्याचे भासवुन विक्री करणे करीता आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
दिनांक 17 जुलै 2024 रोजी शिर्डी येथील हॉटेल टेम्पल ट्री या ठिकाणी 2 संशयीत इसम बनावट आधारकार्ड देवून मुक्कामी थांबलेले होते. हॉटेल मॅनेजरला आधार कार्ड बनावट असल्याचा संशय आल्याने त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला होता. सदर तक्रारी अर्जाचे चौकशीमध्ये हॉटेल टेम्पल ट्री मध्ये थांबलेल्या 2 इसमांनी बनावट आधारकार्ड देवून वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाल्याने पो. कॉ. गणेश रघुनाथ घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिर्डी पो.स्टे.गु.र.नं. 422/2024 भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 336, 336 (2), 336 (3), 337, 340 (2) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

सदर घटना घडल्यानंतर 2 दहशतवादी/हल्लेखोर शिर्डीमध्ये येवुन राहिल्याची बातमी पसरल्याने शिर्डी परिसरातील हॉटेल व इतर व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिनेश आहेर यांना गुन्ह्यातील दोन्ही आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करणे बाबत आदेशित केले होते.

पो.नि. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि समाधान भाटेवाल, अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, रविंद्र कर्डीले, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, संदीप दरंदले, फुरकान शेख, संतोष खैरे, आकाश काळे, सागर ससाणे, रोहित येमुल व संभाजी कोतकर यांचे पथक नेमून आरोपींचा शोध घेवून कारवाई करण्याच्या सुचना देत पथक रवाना केले. पथकाने हॉटेल टेम्पल ट्री येथे तसेच हॉटेलच्या आजु बाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक करुन संशयीतांचे फोटो गुप्त बातमीदारांना प्रसारीत केले. पथक गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असतांना 19 जुलै रोजी पो. नि. दिनेश आहेर यांना फोटोतील 2 संशयीत इसम हे काळ्या रंगाचे विना क्रमांकाचे महिंद्रा थार गाडीमधून छत्रपती संभाजीनगर येथून नेवाशाच्या दिशेने येत आहेत, अशी माहिती मिळाल्याने पोनि आहेर यांनी ही माहिती पथकास कळवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.

पथकाने तात्काळ खडका फाटा, ता. नेवासा येथील टोल नाका येथे जावुन सापळा रचुन थांबलेले असतांना काळ्या रंगाची विना क्रमांकाची थार गाडी येताना पथकास दिसली. पथकाने गाडी थांबवण्याचा इशारा करताच संशयीतांनी थार गाडी छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने वळवुन पळुन जाण्याच्या प्रयत्न केला. पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची नावे वसीम ताहीर शेख, रा. बिलोली, जिल्हा नांदेड व फिरोज रफीक शेख, रा. सुतारगल्ली, बिलोली, जिल्हा नांदेड असे असल्याचे सांगितले. आरोपींकडे त्यांनी हॉटेल टेम्पल ट्री, शिर्डी येथे हॉटेल मधील रुम बुक करण्यासाठी दिलेले बनावट आधारकार्डच्या 2 झेरॉक्स मिळुन आल्या.

वरील दोन्ही आरोपींकडे हॉटेल टेम्पल ट्री, शिर्डी येथे बनावट आधारकार्ड देवुन रुम बुक करुन राहण्याचे कारणाबाबत विचारपुस करता दोन्ही संशयीत हे बनावट सोने आणुन शिर्डी परिसरातील नागरीकांची ओळख करुन, नागरीकांचा विश्वास संपादन करुन त्यांचेकडे असलेले केमीकलचे आधारे बनावट सोने हे खरे असल्याचे भासवुन विक्री करण्याकरीता असल्याचे सांगितल्याने त्यांच्याकडील बॅगची झडती घेता विविध प्रकारचे रसायनांच्या बाटल्या, मोबाईल फोन व महिंद्रा कंपनीची थार असा एकुण 13 लाख 35 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपींना ताब्यात घेवुन शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : पानिपत येथे स्मारक उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून पानिपत येथील कालाआंब परिसरात एक स्मारक (Memorial) उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis...