Saturday, September 14, 2024
Homeमुख्य बातम्या'पुण्याहून पुणतांबा 2.0'! शिर्डी-तिरुपती विमान उडाले नाशिकहून; जाणून घ्या सविस्तर

‘पुण्याहून पुणतांबा 2.0’! शिर्डी-तिरुपती विमान उडाले नाशिकहून; जाणून घ्या सविस्तर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

प्रवाशांचा उदंड प्रतिसाद असताना विमान कंपन्याच्या बेजबाबदार कारभारामुळे विमानसेवा क्षीण होत असल्याचे दिसून येत आहे. नाशिकच्या विमान सेवेला नव्याने पून्हा घरघर लागत असल्याचे चित्र असून या सेवा सक्षम करण्यासाठी नाशिककरांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याच्या भावना व्यक्त होत आहे…

- Advertisement -

उडान करारात सूरू करण्यात आलेल्या अलायन्स एअर व स्टार एअर या दोन विमान कंपन्यांनी नाशिक विमानतळावरुन दिल्या जाणार्‍या आपल्या सेवा दि.1 नोव्हेंबरपासून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. तर सलग सूरू असलेल्या स्पाइस जेट विमान कंपनीचे एकाच आठवड्यातील दोन ते तीन विविध घटनांमुळे पर्यटकांना धक्का देण्याचे तंत्र अवलंबल्याचे दिसून येत आहे.

शुक्रवारी शिर्डीहून तिरुपतीला उड्डाण करणारे स्पाईस जेटचे विमान तांत्रिकीकरणामुळे नाशिक विमानतळावरून उड्डाण करण्यात असल्याचे कंपनीने जाहीर केल्याने प्रवाशांची मोठी धांदल उडाली असल्याचे समोर आले आहे.

शिर्डीहून तिरुपतीला जाण्यासाठी शुक्रवारी अनेक प्रवासी नाशिकहून शिर्डीच्या दिशेने मार्गस्थ झाले होते तर बरेचसे प्रवासी शिर्डीला पोहोचले होते. शिर्डीला पोहोचलेल्या प्रवाशांना विमान कंपनीने नाशिकला परत आणले.

मात्र नाशिकहून जाणार्‍या अनेक प्रवाशांना अर्ध्या वाटेतूनच नाशिक विमानतळाकडे परत फिरावे लागले. यातून प्रवासाला निघाल्यानंतर होत असलेल्या या मन:स्तापामुळे पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शिर्डी-तिरुपती विमान हे साडेपाच वाजता शिर्डी विमानतळावर उड्डाण करणार होते मात्र तांत्रिक कारणामुळे ते नाशिकहून उड्डाण करणार असल्याचे विमान कंपनीने जाहीर केले साडेपाचला शेड्युल बनलेले असले तरी विमानाचा नाशिक ओझर विमानतळावरून साडेसात वाजता उड्डाण करणार असल्याचे कंपनीच्या या निर्णयामुळे प्रवाशांची धांदल उडाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

अखेर धावपळ करीत पर्यटकांनी नाशिक विमानतळावर विमान पकडले. वेळेचे पक्के नियोजन असणार्‍या विमान सेवेतील या विसंवादामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. एकाच आठवड्यात एकाच विमान कंपनीच्या सलग धक्क्यांमुळे नाशिककर चिंता व्यक्त करताना दिसून येत आहेत.

नाशिक विमानतळावरुन सेवा देणार्‍या एअर अलायन्स व स्टार एयरने विमानसेवा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर स्पाइस जेटला प्रवाशी वाहतुकीच्या मोठ्या संधी असतानाही नियोजनाचा अभाव अथवा विमान कंपन्यांचा बेजबाबदार कर्मचार्‍यांमुळे विमान कंपनीच्या सेवावरील विश्वासार्हता लोप पावण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कठोर प्रयत्नांतून व अतिशय प्रतिकूल परिस्थिती सुरू झालेली विमानसेवा पुन्हा एकदा अडथळ्याच्या शर्यतीत अडकल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी, उद्योजक, समाजसेवी संघटनांनी यासाठी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज असल्याचे चित्र आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या