Friday, May 3, 2024
Homeधुळेपेट्राल पंपावर चोरी, अडीच हजार लिटर डिझेल लंपास

पेट्राल पंपावर चोरी, अडीच हजार लिटर डिझेल लंपास

शिरपूर – Shirpur – प्रतिनिधी :

शिरपूर-चोपडा रस्त्यावरील सावेर फाटा येथील पेट्रोल पंपाच्या टाकीतून चोरट्यांनी तब्बल अडीच हजार लिटर डिझेल चोरल्याची घटना उघडकीस आली आहे.

- Advertisement -

सावेर फाटा येथे शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे नगरसेवक तथा किसान विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त रोहित रंधे यांच्या मालकीचा जय पेट्रोलिअम हा पंप आहे.

त्याचे काम पूर्ण झाले असून डिझेल स्टोरेज टाकीची चाचणी घेण्यासाठी दि. 31 डिसेंबरला त्यात तीन हजार लिटर डिझेल टाकले होते.

दि. 16 जानेवारीला पंपावरील कर्मचार्‍यांना टाकीच्या बाजूला डिझेलचा वास आल्याने त्यांनी तपासणी केली असता टाकीच्या झाकणाचे नटबोल्ट काढल्याच्या खुणा दिसून आल्या.

त्यांनी टाकीची पाहणी केल्यावर अडीच हजार लिटर डिझेल चोरीला गेल्याचे आढळले. त्यांची किंमत पावणेदोन लाख रुपये आहे. त्याबाबत थाळनेर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

दरम्यान भर रस्त्यावरील पेट्रोल पंपाच्या टाकीतून डिझेल चोरीस गेल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हेगारांचा तातडीने शोध घेण्याची मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या