Thursday, September 19, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन; काय म्हणाले आदित्य ठाकरे; वाचा सविस्तर

नाशिकमध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन; काय म्हणाले आदित्य ठाकरे; वाचा सविस्तर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

लोकसभेची लढाई साधी नव्हती त्यांच्या सोबत इडी,आयबी,सीबीआय,निवडणूक आयोगांची ताकद असलेली मोठी शक्ती असलेला पक्ष भाजपा समोर होती. तर आपल्याच्याकडे संवीधान, जनता, शाहूुफूले आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या ताकदीवर विजय मिळवलेला आहे. देशातील दोन राज्यात विधानसभा निवडणूका घोषीत केल्या मात्र पराभव दिसून येत असल्याने महाराष्ट्रात निवडणूका लावण्याला ते घाबरतात. राज्यातील हीच ताकद महाराष्ट्र लूटणार्‍यांना भारी पडणार असल्याचे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी नाशिक येथे केले.

देशातील राजकारणात कोणाचीच मस्ती चालणार नाही. देशात फक्त संविधान व लोकशाहीच चालणार आहे. त्यामुळे लोकसभेत राज्याने दिलेल्या निकालावरुन पराभवाची जबाबदारी स्विकारुन सरकारने राजिनामा देऊन निवडणूकीला सामोरे जाणे आपेक्षित होते. मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक, मुंबई-अहमदाबाद या महामार्गांची वाट लागलेली आहे. येणार्‍या काही काळात या महामार्गावर दवाखान्यांची मालिका लावावी लागेल जेणेकरून चालकांना उपचार करता येतील. सरकारकडे नैतिकता राहिलेलीच नाही. राज्याने भाजपच्या सरकारला नाकारले आहे.

बहिणींना लाडकी बहीण म्हणून पैसे दिले त्यापेक्षा त्यांना सुरक्षा देणे गरजेचे आहे भविष्यात पंधराशे रुपयांमध्ये वाढ करणार असल्याचे गाजर दाखवले जात आहे. हिम्मत असेल तर वाढीव रक्कम आत्ताच द्या असे आव्हान त्यांनी राज्यसरकारला दिले. शिवसेनेच्या पाठीत खंबीर खोपसणार्‍यावर राज्याचा विश्वास बसेल काय? असा सवाल त्यांनी उपस्थित करताच महिलांनी नकाराच्या घोषणा दिल्या.

लाडक्या बहिणींचा वाढीव निधीच्या सोबत त्यांना सुरक्षा देणारा शक्ति कायदा हा पूर्वी आणला होता. तो कायदा आणखी सक्षम करून महिलांच्या पाठीशी त्याची भक्कम ढाल उभी करणार असल्याचे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.

२०२२ साली खंजीर खोपसून राज्यात सरकार पाडले तेव्हापासून राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर व विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. जनतेला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शेवटी आमदारांना स्थानिक प्रश्नांमध्ये हात टाकण्याची वेळ आली आहे. कारण स्थानिक लोकप्रतिनिधीच नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या सर्व भ्रष्ट अधिकार्‍यांना जेलमध्ये टाकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जगात सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरवणार्‍या भाजपला महाराष्ट्राने खाली आणून ठेवले. दिंल्ली पुढे नतमस्तक होणार्‍याना त्यांची जागा दाखवली. आपला पक्ष दिल्लीपूढे झूकत नाहीं तर संतांसमोर, मावळ्यांसमोर, छत्रपती समोर झुकणारी आपली सेना असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात पुढे जात आहे याची भाजपला खंत असल्याने राज्यातील उद्योग पळवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असल्याचा आरोप ही त्यांनी केला.

यावेळी धान्यावर चित्र काढणार्‍या ऐश्वर्या अवसरकर हिचा सत्कार आदित्य ठाकरे यांनी केला. प्रमोद जाधव, मदन देव व पारधी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक काळात शिवसैनिकांनी दिलेल्या योगदानातील विविध प्रसंग विषद केले. मतमोजणीच्या वेळी सर्वांनी बारकाईने लक्ष दिल्यामुळे कुठलाही गोंधळ विरोधकांना करता आला नसल्याचे त्यांनी नमूद केले. खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेतील विजय हा कार्यकर्त्यांचा विजय असल्याचे सांगून,यापुढे पक्ष वाढीसाठी आणि समाजकार्यासाठी आपण पूर्ण वेळ काम करणार असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनाप्रमुखांनी दिलेले ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे सूत्र आपण अंगीकारले असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डीजी सूर्यवंशी यांनी केले तर आभार महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी मानले यावेळी वसंत गीते विनायक पांडे दत्ताजी गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या