धुळे । dhule
जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत (President, Vice President in election) शिवसेनेने उमेदवार (Shiv Sena candidate) देवूनही त्यांना मते न (without voting) देता तटस्थ (neutral) राहिल्यामुळे सेनेच्या बोरकुंड गटातील सदस्या शालिनी बाळासाहेब भदाणे (Shalini Balasaheb Bhadane of Sena) यांना काळे फासून (blacked out) अंगावर शाई फेकण्यात आली. मात्र या संदर्भात रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल (No complaint was filed) झालेली नव्हती.
जिल्हा परिषदेत शिवसेनेचे अवघे चार सदस्य आहेत. मात्र सेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीने तरीही अध्यक्ष, उपाध्यक्षासाठी उमेदवार रिंगणात उतरविले. अध्यक्षपदासाठी सेनेच्या सुनिता सोनवणे यांना उमेदवारी मिळाल्याने रितसर व्हीप बजाविण्यात आला.
मात्र व्हीप स्वीकारुन देखील शिवसेनेच्या बोरकुंड गटाच्या सदस्या शालीनी भदाणे व रतनपुरा गटाच्या अनिता पाटील यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी संतप्त झाले.
निवडणूक संपल्यानंतर महिला आघाडीच्या पदाधिकारी हेमाताई हेमाडे व सहकार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या दोन्ही महिला सदस्यांना गाठत सोबत आणलेली शाई शालीनी भदाणे यांच्या अंगावर फेकून काळे फासले. मात्र या गडबडीत सदस्या अनिता पाटील यांनी तेथून काढता पाय घेतला. या घटनेची चांगलीच चर्चा रंगली परंतू याबाबत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.
सुपारी बहाद्दरांनी निष्ठा शिकवू नये-भदाणे
प्रत्येक निवडणुकीत स्वत:ची बोली लावणार्या सुपारी बहाद्दरांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये. जिल्हा परिषदेच्या महिला सदस्यांवर भ्याड हल्ला करण्यात कसली आली मर्दांनगी, असा सवाल बोरकुंडचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांनी पत्रकान्वये केला आहे.
जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकप्रसंगी शालिनी बाळासाहेब भदाणे यांच्यावर काहींनी भ्याड हल्ला केला. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब भदाणे यांनी पत्रक प्रसिध्दीस दिले आहे.
महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये सर्वांत कमी संख्याबळ हे शिवसेनेचे असतांना सेनेला उमेदवारी देणे हीच हास्यास्पद बाब आहे. विजयाची शून्य शक्यता असल्याने सुनिता सोनवणे यांना निव्वळ बळीचा बकरा बनवणे आम्हाला मान्य नव्हते, म्हणुन आम्ही या निवडणुक प्रक्रीयेत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर निवडणुकीत जि.प.च्या महिला सदस्या शालिनी भदाणे यांच्यावर भ्याड हल्ला झाला. सेनेत महिलांचा सन्मान करण्याची परंपरा आहे. नेहमी निवडणुक काळात स्वत:ची बोली लावण्याचा ज्यांचा इतिहास आहे अशा नकली शिवसैनिकांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये, असेही बाळासाहेब भदाणे यांनी पत्रकात म्हटले आहे.