Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिक शिवसेना जिल्हाप्रमुख तूर्तास बदलणार नाही..!

नाशिक शिवसेना जिल्हाप्रमुख तूर्तास बदलणार नाही..!

नाशिकरोड । Nashik

शिवसेनेचे महानगरप्रमुख बदलल्यानंतर जिल्हाप्रमुख बदलण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून शिवसैनिकांमध्ये सुरू होती. परंतु आगामी होणार्‍या महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतरच जिल्हाप्रमुख बदलणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

- Advertisement -

शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची विधान परिषदेवर निवड झाली आहे. परंतु त्यांच्या निवडीला राज्यपालांनी अद्याप मंजुरी दिलेली नाही. करंजकर हे आमदार झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नवीन जिल्हाप्रमुख बदलण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे.

परंतु करंजकर यांची जिल्ह्याभर शिवसैनिकांमध्ये असलेली पकड त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जुळलेली नाळ यामुळे जिल्हाप्रमुख म्हणून करंजकर सध्या तरी तेच योग्य असल्याचे अनेक शिवसैनिकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे चार वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला चांगले यश मिळाले.

महापालिकेत शिवसेना दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष असून तर जिल्हा परिषदेत गेल्या चार वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. तसेच भगूर नगरपालिकेची सत्तासुद्धा शिवसेनेने जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या नेतृत्वाखाली एक हाती मिळविलेली आहे. त्याचप्रमाणे जिल्हाप्रमुख करंजकर यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीतही खासदार हेमंत गोडसे प्रचंड मतांनी निवडून आले होते.

मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत देवळाली, सिन्नर व इगतपुरी या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले असले तरी सदरचा पराभव म्हणजे शिवसेनेतील काही प्रमाणात असलेली अंतर्गत गटबाजी तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध विधानसभा निवडणुकीत विरोधी भूमिका घेऊन शिवसेनेच्या उमेदवारांना पराभूत केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील झालेल्या पराभव हा शिवसेनेच्या वरिष्ठांना मान्य नसल्याचे समजते.

या सर्व राजकीय घडामोडी लक्षात घेता सध्यातरी विद्यमान जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या पदाला कुठलाही धोका नाही. त्याचप्रमाणे आगामी होणार्‍या ग्रामपंचायत महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणूका या करंजकर यांच्या नेतृत्वाखालीच लढविल्या जाव्या, अशी शिवसैनिकांची मागणी असल्याने सध्यातरी शिवसेना जिल्हाप्रमुख बदलण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या