धुळे । प्रतिनिधी dhule
महापालिकेने (Municipal Corporation) मनमानी पध्दतीने पुनर्मूल्यांकन केलेल्या मालमत्ताधारकांना नोटीसा (Notice) बजावण्यात आल्या आहेत. या वाढीव घरपट्टीविरोधात शिवसेना उबाठा आक्रमक भूमिका घेतली आहे.
वाढीव करवाढ रद्द करावी, अशी मागणी करीत आज शिवसेनेतर्फे रेड्याच्या पाठीवर मनपाची वाढीव हुकूमशाही घरपट्टीचा उल्लेख करत मिरवणूक काढली. मनपा प्रशासन व सत्ताधारी भाजपाचा जोरदार घोषणा बाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच आयुक्त व भाजपा शहर जिल्हाध्यक्षांनी वाढीव मालमत्ता कराविषयी भुमिका स्पष्ट करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या आंदोलनाने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले. या आंदोलनात संहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, संपर्कप्रमुख प्रा.शरद पाटील, महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ.सुशील महाजन, महिला आघाडीच्या हेमा हेमाडे, जयश्री महाजन, कैलास पाटील, नरेंद्र परदेशी, प्रफुल्ल पाटील, देविदास लोणारी, अरूणा मोरे, ललित माळी, भरत मोरे, संदीप सुर्यवंशी, संजय जवराज, कैलास मराठे, प्रविण साळवे, आबा भङागे, भटु गवळी, आनंद जावडेकर, रफीक पठाण, लखन चांगरे, छोटु माळी, प्रकाश शिंदे, पंकज भारस्कर, शरद गोसावी, मुन्ना पठाण, संदिप चौधरी, प्रविण पाटील, दिनेश पाटील, पिनु सुर्यवंशी, सागर निकम, निलेश कांजरेकर, अजय चौधरी, मुरलीधर जाधव, विवेक सुर्यवंशी, नितीन जडे, मुकेश भोकरे, शुभम रणधीर, योगेश पाटील, गुलाब धोबी, संतोष शर्मा, मनोज शिंदे, प्रतिभा सोनवणे आदी सहभागी झाले होते.