Friday, November 22, 2024
Homeनाशिकदेवळाली मतदारसंघावर भगवा फडकवा; शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकरांचे आवाहन

देवळाली मतदारसंघावर भगवा फडकवा; शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकरांचे आवाहन

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

एकमेकांच्या तंगड्या ओढून गटबाजी करण्यापेक्षा शिवसेना (Shivsena) मजबूत करा व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेचा प्रत्येक आमदार (MLA) निवडून आलाच पाहिजे. देवळाली मतदारसंघात सुद्धा भगवा फडकला पाहिजे त्यासाठी शिवसैनिकांनी आत्तापासूनच कामाला लागावे असे, आवाहन शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर यांनी केले.

- Advertisement -

हे देखील वाचा : राज ठाकरेंचा विधानसभेसाठी स्वबळाचा नारा; ‘इतक्या’ जागा लढवणार

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देवळाली मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा मेळावा शिवसेना उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे व देवळाली विधानसभा प्रमुख योगेश भोर यांनी विहितगाव येथील हंडोरे लॉन्समध्ये आयोजित केला होता. त्याप्रसंगी रवींद्र मिर्लेकर (Ravindra Mirlekar) बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, तालुकाप्रमुख प्रकाश मस्के, माजी आमदार योगेश घोलप, महिला आघाडीच्या भारती ताजनपुरे, माजी नगरसेवक भैय्या मान्यवर, सुधाकर जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.

हे देखील वाचा : पुण्यात पावसाचा हाहाकार; अनेकांच्या घरांत शिरलं पाणी, नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू बोटी मागवल्या

यावेळी बोलतांना मिर्लेकर म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) नाशिक लोकसभा मतदारसंघात आपण जे यश मिळविले त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. भविष्यकाळात पुन्हा एकदा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राज्यातील प्रत्येक मतदारसंघ महत्त्वाचा असून त्यापैकी देवळाली हा मतदारसंघ सुद्धा महत्त्वाचा आहे. या प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा आमदार निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी आपली पूर्णपणे ताकद लावून उमेदवार निवडून आणावा. त्यासाठी घराघरात जाऊन माणसे जोडण्याचे काम शिवसैनिकांनी करावे.

हे देखील वाचा : “लाडकी बहीण, लाडका भाऊ एकत्र राहिले असते तर दोन्ही…”; राज ठाकरेंचा खोचक टोला

प्रत्येक घरातील व्यक्तीला सभासद करून शिवसैनिक करा, त्यासाठी एका मतदारसंघात किमान २५ हजार घरे शोधून त्यातील चार जण सभासद केले तर एक लाख मतदार होतात हे सर्व आपल्या हक्काचे मतदार असतील असे झाले तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. ज्याप्रमाणे निष्ठावंत शिवसैनिक आहे त्याप्रमाणे निष्ठावंत मतदार झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी म्हटले. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर देश व संविधान धोक्यात आले होते. त्यामुळे ४०० चा आकडा पार करू असे आवाहन करणाऱ्यांचे स्वप्न भंगले.गेल्या दहा वर्षात महागाईवर पंतप्रधान मोदी एक शब्द सुद्धा बोलले नाही. देवळाली मतदारसंघ हा आपलाच आहे व राहिला पाहिजे त्यासाठी तुमची ताकद दाखवा असे मिर्लेकर यांनी म्हटले. तसेच शिवसेना चळवळीतून व आंदोलनातून मोठी झाली आहे. त्याकरता गावागावात जाऊन नागरिकांचे प्रश्न सोडवा असे आवाहनही मिर्लेकर यांनी केले.

हे देखील वाचा : Rain Update News : राज्यात पुढील चार दिवस ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार दमदार पाऊस

दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले की, जिल्ह्यातील आठ मतदारसंघात आपली ताकद असून हे मतदारसंघ आपल्याला मिळायलाच पाहिजे त्यासाठी तुम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करा. या आठ मतदारसंघापैकी सहा उमेदवार हे हमखास निवडून येतील असेही बडगुजर म्हणाले. यावेळी सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन योगेश गाडेकर यांनी केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या