Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याEknath Shinde : "एकनाथ शिंदे एकट्याच्या जीवावर मुख्यमंत्री झालेले नाहीत"; आमदार भरत...

Eknath Shinde : “एकनाथ शिंदे एकट्याच्या जीवावर मुख्यमंत्री झालेले नाहीत”; आमदार भरत गोगावलेंचे जाहीर सभेत विधान

मुंबई | Mumbai

गेल्यावर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या (ShivSena) ४० आणि काही अपक्ष आमदारांना (MLA) सोबत घेऊन पक्षात बंडखोरी करत भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसेनेच्या ४० आमदारांचे पाठबळ मिळाले. मात्र, सत्तेत वाटा मिळाला त्यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या शिवसेनेच्या (Shivsena) काही आमदारांना मंत्रिपदापासून दूर राहावे लागले होते.

- Advertisement -

Maharashtra Rain Update : राज्यात आजपासून पावसाचे पुनरागमन? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय, वाचा सविस्तर

त्यानंतर महिनाभरापूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीतील एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सहभागी झाला. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारही करण्यात आला. मात्र, त्या विस्तारात राष्ट्रवादीच्याच आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी भाजप आणि शिंदे गटातील कोणत्याही आमदाराला मंत्रिपदाची शपथ देण्यात आली नाही.

त्यामुळे दोन्ही पक्षांत नाराजी पाहायला मिळाली होती. यात शिंदे गटातील काही आमदारांनी मंत्रिपद न मिळाल्यामुळे उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. यामध्ये रायगडचे आमदार भरत गोगावले (MLA Bharat Gogawle) यांचे नाव अग्रस्थानी होते. अशातच आता गोगावले यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान केले आहे.

धक्कादायक! अल्पवयीन मुलीची तरुणाकडून चाकूने सपासप वार करत हत्या

रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील खानावचे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी आमदार भरत गोगावले आणि महेंद्र दळवींच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी कार्यक्रमात बोलतांना आमदार गोगावलेंनी मंत्रीपद न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त करत “एकनाथ शिंदे हे एकट्याच्या जीवावर मुख्यमंत्री झालेले नसून आमच्यासारखे ४० आणि इतर ६ शिलेदार ताठ मानेने आम्ही त्यांच्यामागे उभे राहिलो म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासारखा चांगला माणूस मुख्यमंत्री झाला” असे म्हटले आहे.

Niphad News : करवाढ मागे घेण्यासाठी नागरिकांचे उपोषण

तसेच गोगावले यांनी त्यांच्या हुकलेल्या मंत्रिपदाचा किस्सा सांगताना म्हटले की, एका आमदाराने पत्नी आत्महत्या करेल सांगितले, दुसऱ्याने राजीनाम्याची धमकी दिली तर तिसऱ्याने नारायण राणे संपवतील असे म्हणत ३ आमदारांनी मुख्यमंत्र्यांना मंत्रीपदासाठी गळ घातली. म्हणून पेचात पडलेल्या मुख्यमंत्र्यांना या आमदारांना मंत्रीपद द्यावे असे सागून आपण मंत्रीपदापासून दूर राहिलो, असे गोगावले म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

खबरदार! वाहतूक नियम भंग कराल तर…; आता शहरावर ‘इतक्या’ सीसीटीव्हींची नजर

- Advertisment -

ताज्या बातम्या