Wednesday, July 24, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरे गटाचे धक्कातंत्र; नवी कार्यकारणी केली जाहीर, नेतेपद, उपनेतेपद आणि संघटकपदी केली...

ठाकरे गटाचे धक्कातंत्र; नवी कार्यकारणी केली जाहीर, नेतेपद, उपनेतेपद आणि संघटकपदी केली ‘यांची’ नियुक्ती

मुंबई | Mumbai

- Advertisement -

शिवसेना ठाकरे (Shivsena Thackeray Group) गेल्या वर्षी उभी फुट पडल्यानंतर आता उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षाच्या कार्यकारिणीचा विस्तार केला आहे. या पक्ष विस्तारात नव्या सहा नेत्यांसोबत उपनेते आणि संघटकपदाच्या नव्या नेमणुका जाहीर केल्या आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून या नेमणुका जाहीर केल्या असून पक्षाच्या कार्यकारिणीचा विस्तार जाहीर करण्यात आला आहे.

शिवसेना ठाकरे गटाला गेल्या वर्षी मोठे खिंडार पडले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार ठाकरे गटातून बाहेर पडले होते. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे पहायला मिळाले. तेव्हापासून शिवसेनेच्या ठाकरे गटात अनेक नेत्यांचे इनकमिंग आऊटगोईंग सुरु आहे. त्यातच आता उपनेतेपदाच्या आणि संघटकपदाच्या नेमणुका जाहीर केल्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर राज्यातील पक्षवाढीस बळकटी मिळावी यासाठी नव्या नियुक्त्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Samruddhi Mahamarg Accident : ‘समृद्धी’वरील १२ जणांच्या मृत्यूला RTO जबाबदार; भर रस्त्यात ट्रक थांबवल्याचा VIDEO समोर

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाकडून सहा नव्या नेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून ज्यामध्ये विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचारे, रवींद्र वायकर, भास्कर जाधव आणि सुनील प्रभू या सहा जणांचा समावेश करण्यात आला आहे. नेत्यांसोबतच पक्षाचे उपनेते आणि संघटकपदी देखील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

विजय साळवी (कल्याण), संजय जाधव परभणी, संजय पवार (कोल्हापूर), राजुल पटेल (मुंबई), शीतल देवरू (मुंबई), शरद कोळी (सोलापूर ) यांना उपनेतेपद देण्यात आले आहे. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाच्या सचिवपदी वरूण सरदेसाई, साईनाथ दुर्गे आणि सुप्रभदा फातर्पेकर कायम राहणार आहेत.

तर संघटक म्हणून अस्मिता गायकवाड (सोलापूर), शुभांगी पाटील (नाशिक), जान्हवी सावंत (कोकण), छाया शिंदे (सातारा), विलास वाव्हळ (मुंबई), विलास रुपवते(मुंबई), चेतन कांबळे (संभाजीनगर ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये एकूण १६ जणांचा समावेश झाला आहे. ज्यामध्ये मनोहर जोशी, लीलाधर डाके, दिवाकर रावते, सुभाष देसाई आदित्य ठाकरे, संजय राऊत चंद्रकांत खैरे, अनंत गीते, अरविंद सावंत, भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचारे, रवींद्र वायकर आणि सुनील प्रभू यांचा समावेश आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या