धुळे dhule। प्रतिनिधी
पुरेसे पाणी उपलब्ध असतांनाही केवळ महापालिकेतील (Municipal Corporation) सत्ताधार्यांच्या (rulers) हलगर्जीपणामुळे (laziness) धुळेकरांना पाणी टंचाईचा (water scarcity) सामना करावा लागत आहे. यामुळे शिवसेना (उबाठा) (Shiv Sena (Ubhata)) तर्फे हंडामोर्चा (Handa Morcha) काढण्यात आला. हंडा घेवून महापालिकेत आलेल्या महिलांनी आयुक्तांच्या दालनासमोर(Commissioner’s Hall) ठिय्या आंदोलन (Thiya Movement) केले तर पोतराजनेही (Potrajne) महापालिका आवारात स्वतःच्या अंगावर आसुड ओढून पाणी प्रश्नाकडे लक्ष (Attention to the water issue) वेधले.
आई आणि पत्नीच्या डोक्यात फ्रायपॅन घालून निर्घुण हत्याBad News photos # पूणे मेहकर बसच्या अपघातात सहा जण ठार
विधानसभा संघटक ललीत माळी यांनी 154 कोटी खर्चाच्या पाणी योजनेतील भ्रष्टाचार लपविण्यासाठी मनपातील सत्ताधारी नागरीकांची दिशाभुल करीत असून धुळेकरांना 10 ते 15 दिवसाआड पाणी मिळत आहे असा आरोप करण्यात आला. शहरात आठ ते दहा दिवसाआड पाणी मिळत असल्याने नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शिवसेना (उबाठा) तर्फे आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून महापालिकेवर हंडामोर्चा काढण्यात आला.यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. भर उन्हात घोषणाबाजी करीत निघालेल्या या मोर्चाने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले. तर मोर्चात सहभागी पोतराजने स्वतःच्या अंगावर आसुड ओढून घेत सहभाग नोंदविला. महापालिका प्रवेशद्वाराजवळ मोर्चेकर्यांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणला.
गावठी कट्टा घेऊन फिरणारा बोदवड पोलिसांकडून जेरबंदचार युवकांचा पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
मोर्चातील महिलांनी हंड्यासह आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला. आंदोलनात संगीता जोशी, मनीषा शिंपी, उज्वला कोतकर, श्रीमती गिरासे, केसर राठोड, सौ. मोरे, शिल्पा जाधव, सुनीताबाई, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन, धीरज पाटील, विधानसभा संघटक ललित माळी, पिंटू शिरसाट, चंद्रकांत गुरव, प्रफुल्ल पाटील, पंकज भारस्कर, भरत मोरे, देवीदास लोणारी, सुनिल पाटील, युवा सेनेचे हरीष माळी, विनोद जगताप, प्रवीण साळवे, हिमांशु परदेशी, दिनेश पाटील, कैलास मराठे, महादू गवळी, भटू गवळी, प्रकाश शिंदे, लक्ष्मण बोरसे, सिद्धार्थ करनकाळ, मोहित वाघ, अक्षय पाटील, शुभम रणधीर आदी सहभागी झाले होते.
अमळनेरचा अट्टल गुन्हेगार अमरावती येथे स्थानबद्ध
पोलीस आणि शिवसेना पदाधिकार्यांमध्ये वाद
मोर्चा येणार असल्यामुळे पोलिस महापालिकेत अगोदरच दाखल झाले होते. पोलिसांनी मोर्चातील महिलांसह शिवसेना पदाधिकार्यांना आयुक्तांच्या कॅबिनमध्ये जाण्यापासून रोखले त्यामुळे शिवसेना पदाधिकारी व पोलिसांमध्ये शाब्दीक वाद झाला. अखेर पोलिसांनी महिलांच्या शिष्टमंडळाला आयुक्तांना भेटण्यास परवानगी दिली. त्यानंतर हा वाद संपुष्ठात आला. महिलांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना निवेदन दिले.
पोतराजने वेधले लक्ष
महापालिकेच्या आवारात मोर्चा धडकल्यानंतर पोतराजने स्वत:च्या अंगावर आसुड ओढून घेतले. या अनोख्या आंदोलनामुळे अनेकांचे लक्ष वेधले गेेले. यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजीही केली.
समाजवादी पार्टीच्या नगरसेविकेचे आंदोलन
महापालिका प्रशासनाची उदासीनता व निष्काळजीपणामुळे मुबलक पाणीसाठा असूनही नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळे प्रभाग क्र. 12 अ च्या नगरसेविका अन्सारी फातेमा बी नुरुलअमीन यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत निषेध आंदोलन करण्यात आले.
आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील पाणी प्रश्नासाठी महापालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते. यामुळे अनेकवेळा समाजावादी पार्टीतर्फे निवेदन देण्यात आले. परंतू त्याची दखल घेण्यात आलेली नाही. मुबलक पाणीसाठा असतांना दहा ते पंधरा दिवस शहराला पाणीपुरवठा होत नाही.
पाणी प्रश्नासाठी पदाधिकारी व अधिकार्यांनी बैठका घेतल्या परंतू त्यात ठोस असा निर्णय घेण्यात आलेला नाही. महापालिका प्रशासनातील अधिकारी उदासीन असल्यामुळे शहराला कृत्रिम पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. अधिकार्यांच्या बेजबाबदारपणामुळे लाखो रुपयांचा निधी पाण्यासाठी आला परंतू तरी देखील धुळेकरांना पाणी मिळत नाही. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. शहरवासीयांना वेळेवर पाणी मिळावे. यासाठी उपाय योजना कराव्या. संतप्त समाजवादी पार्टीच्या पदाधिकार्यांनी पाण्यासाठी निषेध आंदोलन केले. या आंदोलनात अन्सारी फातेमाबी, डॉ. सरफराज इमरान शेख यांच्या अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.