Tuesday, May 28, 2024
Homeनाशिककिरीट सोमय्यांच्या प्रतिमेस 'जोडे मारो'; नाशकात ठाकरे गट आक्रमक

किरीट सोमय्यांच्या प्रतिमेस ‘जोडे मारो’; नाशकात ठाकरे गट आक्रमक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नैतिकतेचा आव आणणार्‍या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे एका महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिला वर्गात संतापाची लाट उसळली असून नाशकात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकार्‍यांनी शालिमार चौकात किरीट सोमय्या यांच्या या घाणेरड्या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करून त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले…

- Advertisement -

किरीट सोमय्या कोणत्या प्रवृत्तीचा माणूस आहे हे त्याच्या घाणेरड्या कृत्यावरून सिद्ध झाले आहे. त्याच्या प्रतिमेला जोड्याने मारणे हा जोड्याचा अपमान असल्याच्या प्रतिक्रिया आंदोलक महिलांनी व्यक्त केल्या.

विरोधकांच्या बैठकीवर PM मोदींचा हल्लाबोल; म्हणाले…

या आंदोलनात ज्योती भागवत, हर्षा बडगुजर, स्वाती पाटील, आलका गायकवाड, शीतल भामरे, श्रध्दा दुसाने, फैमिदा रंगरेज, वृषाली सोनवणे, सिमा बडदे, श्रुती नाईक, व्दारका गोसावी, शोभा दिवे, मनिषा लासुरे, एकता खैरे, किर्ती निरगुडे, रंजना थोरवे, चित्रा ढिकले, निलोफर शेख, शोभा पवार, शोभा वाल्डे, सध्या धूमाळ,सैय्यद, शारदा दोंदे, शोभा घोडके, सुजता टिके, उज्वला जगताप, रुखसना फठाण, सकीना शेख, आरती महाले आदींसह महिला मोठ्या संख्येने  सहभागी झाल्या होत्या.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांची त्र्यंबकेश्वर चरणी लीन

- Advertisment -

ताज्या बातम्या