मनमाड | प्रतिनिधी Manmad
येथील नगर परिषदेच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदावर शिंदेंच्या शिवसेनेचे योगेश पाटील यांनी बाजी मारली असून त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उबठा शिवसेनेचे उमेदवार प्रवीण नाईक यांचा 2 हजार 155 मतांनी पराभव केला. योगेश पाटील यांना17 हजार 407 तर प्रवीण नाईक यांना 15 हजार 264 मते मिळाली.
थेट नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी 8 उमेदवार रिंगणात होते त्यात अजित पवार राष्ट्रवादी तर्फे रवींद्र घोडेस्वार यांनी उमेदवारी केली होती त्यानाही पराभव पत्करावा लागला. त्यांना 6 हजार 948 मते मिळाली आहेत.नगरसेवक पदाच्या 31 पैकी 21 तर त्यांचे मित्र पक्ष भाजपने 1 आणि आरपीआयने 2 जागा जिंकून पालिकेत पूर्ण बहुमत मिळविला आहे.
नाशिक जिल्ह्यात मनमाडला कॉंग्रेसला 1 जागा जिंकता आली तर भाजप ने देखील तब्बल 15 वर्षा नंतर कम एक जागा जिंकली आहे.एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या मनमाड शहरात या पक्षाला नगरसेवक पदाच्या फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले थेट नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे निकाल जाहीर होताच समर्थकांनी एकच जल्लोष केला.
थेट नगराध्यक्ष पदासाठी पहिल्या फेरीत शिवसेना उबाठाचे प्रवीण नाईक यांनी आघाडी घेतली होती त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीपासून शिंदेंच्या शिवसेनेचे योगेश पाटील यांनी शेवटच्या 11 व्या फेरी पर्यंत आघाडी घेतलीच नाही तर ती टिकून ठेवत अखेर विजय खेचून आणला त्यांचा निकाल जाहीर होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सोबत युवा सेनेचे जिल्हा प्रमुख फरहान खानयांना खांद्यावर घेऊन एकच जल्लोष केला.
या निवणुकीत शिवसेनेने 21 ,उबाठा शिवसेना 4 ,भाजपा 1,आरपीआय 2,कॉंग्रेस1, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार)-१ आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतमोजणी केंद्र सोबत शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता शिवाय विजयी मिरवणुकीवर देखील बंदी घालण्यात आली होती,सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक तेजबीर सिंग संधू यांनी मनमाडला भेट दिली.
पोलीस निरीक्षक विजय करे यांनी कडक नियोजन केले होते त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मालेगावचे प्रांत नितीन सदगीर आणि पालिकेचे मुख्याधिकारीशेषराव चौधरी यांनी काम पाहिले




