Monday, May 20, 2024
Homeमुख्य बातम्याShiv Shakti Parikrama : भाजप नेत्या पंकजा मुंडे सप्तशृंगी देवी चरणी लीन

Shiv Shakti Parikrama : भाजप नेत्या पंकजा मुंडे सप्तशृंगी देवी चरणी लीन

सप्तशृंगी गड । वार्ताहर Saptshrungi Garh

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्यभरातील धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याला ‘शिव-शक्ती परिक्रमा’ असे नाव देण्यात आले आहे.

- Advertisement -

आज सोमवार दि ४ सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास शिवशक्ती परिक्रमा निमित्त भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. या वेळेस मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.  

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सप्तशृंगी गड देवी संस्थान विश्वस्त मंनज्योत पाटील यांच्या वतीने सप्तशृंगी गडावर उपस्थित झालेले भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी सप्तशृंगी निवासनी देवी ट्रस्टचे व्यस्थापक सुदर्शन दहातोंडे, सुयोग गुरुबक्षानी रोप वे ट्राॅॅलीचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार ,नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पगार, कळवण तालुका अध्यक्ष दीपक खैरनार, कळवण शहर अध्यक्ष निंबा पगार,हेमंत रावले ,चेतन निकम,गौरव पाटील,कृष्णकुमार कांबळस्कर ,विनायक दुबे, प्रकाश कडवे, रामप्रसाद बत्तासे यांच्या वतीने सप्तशृंगी गडावर उपस्थित झालेले भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या