Monday, February 23, 2026
Homeदेश विदेशसंतापजनक! वॉशरूमच्या दरवाजावर शिवरायांचा फोटो, शिवप्रेमींमध्ये संताप

संतापजनक! वॉशरूमच्या दरवाजावर शिवरायांचा फोटो, शिवप्रेमींमध्ये संताप

फरीदाबाद । Faridabad

हरियाणातील फरीदाबाद जिल्ह्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला असून, यामुळे देशभरातील शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींमध्ये तीव्र रोषाची लाट उसळली आहे. येथील सिकरी भागातील ‘मिलन रिसॉर्ट’ (मिलन बँक्वेट हॉल) मध्ये आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मिनी यांच्या प्रतिमांचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने वापर करून त्यांचा अवमान करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, या रिसॉर्टच्या प्रशासनाने स्त्री-पुरुष स्वच्छतागृहाची (वॉशरूम) ओळख पटवण्यासाठी चक्क महापुरुषांच्या फोटोंचा वापर केला होता. पुरुषांच्या वॉशरुमच्या दरवाजावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो, तर महिलांच्या वॉशरुमच्या दरवाजावर राणी पद्मिनी यांचा फोटो लावण्यात आला होता. लिंग दर्शवण्यासाठी (Gender Signage) महापुरुषांच्या प्रतिमांचा अशा प्रकारे वापर करणे हे अत्यंत असंवेदनशील आणि अपमानजनक असल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी देखील हा व्हिडिओ पोस्ट करत या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. “महापुरुषांचा असा अवमान कदापि सहन केला जाणार नाही,” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून उमटत आहेत.

YouTube video player

सोशल मीडियावर शिवप्रेमींचा वाढता दबाव आणि संताप पाहून रिसॉर्ट प्रशासनाने तातडीने तेथून शिवाजी महाराज आणि राणी पद्मिनी यांचे फोटो हटवले आहेत. मात्र, फोटो काढल्यानंतर त्या जागी आता घोड्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. या कृतीमुळे रिसॉर्ट मालकांच्या मानसिकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हे रिसॉर्ट नवीन वशिष्ठ आणि प्रदीप वशिष्ठ यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले जात असून, प्रदीप वशिष्ठ हे माजी संचालक असल्याची माहिती समोर येत आहे, तरीही याबाबत अधिकृत पुष्टी मिळणे बाकी आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर केवळ फोटो हटवून भागणार नाही, तर या कृत्याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. इतक्या मोठ्या वास्तूमध्ये एवढा मोठा अपमान होईपर्यंत स्थानिक प्रशासनाचे किंवा संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष कसे गेले नाही, असा सवालही उपस्थित केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. तसेच राणी पद्मिनी या भारतीय अस्मितेचे प्रतीक आहेत. अशा महान व्यक्तींच्या प्रतिमा वॉशरूमच्या दरवाजावर लावणे हे कृत्य हेतुपुरस्सर होते का, याचा तपास करण्याची मागणी आता शिवप्रेमींकडून केली जात आहे. सध्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण असून सोशल मीडियावर ‘बॉयकॉट मिलन रिसॉर्ट’ सारख्या मोहिमा सुरू झाल्या आहेत.

ताज्या बातम्या

Eknath Shinde : शब्द आणि वेळेला महत्व देणारा नेता अन् ११...

0
मुंबई | Mumbai राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आज (२३ फेब्रुवारी) मुंबईतील विधानभवनात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. त्यानंतर दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून...