मुंबई । Mumbai
करोनामुळे गेली दोन वर्ष शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र, यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा ‘शिवराय मनामनात-शिवराज्याभिषेक घराघरांत’ही संकल्पना घेऊन किल्ले रायगडावर अत्यंत भव्यदिव्य प्रमाणात साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवप्रेमी रायगडकडे रवाना होत आहे.
- Advertisement -
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांकडून शिवप्रेमींसाठी खास सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून एक व्हिडिओ तयार करण्यात आला असून त्यामध्ये वाहतूक व्यवस्था आणि किल्ले रायगडाकडे (Raigad Fort) येणाऱ्या शिवप्रेमींच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था कुठे आणि कशी असेल, याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.