Tuesday, September 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजतारीख पे तारीख! शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी पुढे ढकलली

तारीख पे तारीख! शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी पुढे ढकलली

दिल्ली । Delhi

- Advertisement -

राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना (Shivsena) आमदार अपात्र प्रकरणाची (MLA Disqualification Case) सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु आहे.

दरम्यान आमदार अपात्रतेची सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या वकिलांनी कागदपत्राच्या पुर्ततेसाठी वेळ वाढवून मागितली, ज्यानंतर न्यायालयाकडून ही सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे.

हे हि वाचा : जामखेड येथे गुटखा पकडला; दोघांवर गुन्हा दाखल

सर्वोच्च न्यायालयात आज एकूण १४ प्रकरणांवर सुनावणी आहे. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचं आमदार अपात्रता प्रकरण सातव्या क्रमांकावर होतं. आधी शिवसेना आणि मग राष्ट्रवादीच्या आमदार प्रकरणांवर सुनावणी झाली. मागील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं अजित पवारांसह त्यांच्या ४१ आमदारांना उत्तर दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. पण या आमदारांनी अद्यापपर्यंत उत्तर दाखल केलेलं नाही.

गेल्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांसह असलेल्या ४१ आमदारांनी त्यांचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयाकडे दाखल करायचे असे आदेश दिले होते. सकाळी सर्वोच्च न्यायालयात ज्यावेळी हे प्रकरण मेन्शन करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ मागितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तो वेळ दिला आहे.

हे हि वाचा : बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला; हॉटेलात ८ जणांना जिवंत जाळलं

४१ आमदारांचे सगळे म्हणणे एकत्र करून द्यायचे आहेत त्यासाठी दोन आठवडे लागतील. त्यानंतरच्या आठवड्यात ते सगळे एकत्र करुन सुप्रीम कोर्टाकडे सादर करू, असे नीरज किशन कौल यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या