मुंबई | Mumbai
मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज उमेदवारांचे पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. महत्त्वाची बाब म्हणजे, शिवसेना शिंदे गटातील घराणेशाहीला मतदारांनी थेटपणे नाकारल्याचेही पाहायला मिळाले. कारण, शिवसेना शिंदे गटाकडून ज्या ज्या माजी आमदार किंवा माजी खासदारांच्या घरामध्ये उमेदवारी देण्यात आली होती. त्या सर्वांचा दारूण पराभव झाला आहे. यात समाधान सरवणकर हे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष समाधान सरवणकर यांचे चिरंजीव आहेत. ठाकरे गटाच्या निशिकांत शिंदे यांनी सरवणकर यांचा पराभव केला होता. यानंतर समाधान सरवणकर यांनी भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
समाधान सरवणकर यांनी प्रभाग क्र. १९४ मधून निवडणुक लढवली. ज्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता त्यांनी माझ्या प्रभागात चार-पाच आमदार, दोन पक्षप्रमुखांची मुले प्रचार करत होते. या सगळ्यांच्य टार्गेटवर मीच होतो. तरीही मतदार माझ्यासोबत उभे राहिले. मात्र, भाजपने मदत न केल्यामुळे माझा पराभव झाला, असा आरोप समाधान सरवणकर यांनी केला.
समाधान सरवणकर काय म्हणाले?
माझ्या प्रभागात चार-पाच आमदार प्रचार करत होते. दोन पक्ष प्रमुखांची मुले माझ्या मतदार संघात प्रचार करत होती. त्यांचे टार्गेट मी होतो, तरी मतदार माझ्यासोबत उभे राहिले. माहीम विधानसभेत मला भाजपची मदत झाली नाही. भाजपचे विशिष्ट एक पदाधिकारी होते, त्यांनी सर्वांना सांगितले की यांना मदत करु नका. Whatsapp मेसेजवरुन सांगितले जात होते की, आपल्याला काहीतरी आलेले आहे. त्यामुळे कोणी आम्हाला माहीममध्ये मदत केली नाही, असे समाधान सरवणकर यांनी म्हटले. WhatsApp चॅटमध्ये देखील लिहिण्यात आले होते की, आपल्याला यांचे (समाधान सरवणकर) काम करायचे नाही, आपल्याला यांचा पराभव करायचा आहे, असा दावा समाधान सरवणकर यांनी केला.
मला मतदारांनी साथ दिली. पण बाकी राजकारण असते. विरोधकांनी युती (शिवसेना ठाकरे गट–मनसे) केली होती. युतीमध्ये जर का विधानसभेच्या मतांची एकूण आकडेवारी पाहिली तर त्यांनी आज माझ्या प्रभागात पाच ते सहा हजार मतांनी विजयी होणे, गरजेचे होते. पण ते फक्त ५०० मतांनी जिंकले. त्यामुळे जी काही त्यांची मत होती, ती सुद्धा त्यांना पडली नाहीत. त्यांच्यातील अनेक मतं मला मिळाली, असा दावा सरवणकर यांनी केला आहे. त्यामुळे मला मतदारांनी १०० टक्के साथ दिली. पण आमच्यातच काही गोष्टी कमी राहिल्या आणि ज्यामुळे ५०० मत कमी पडल्याचे सरवणकर यांनी म्हटले.
BJP New President: भाजपात ‘नव्या’ पर्वाला सुरवात; नितीन नबीन भाजपचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही भाजपची ही विशिष्ट टोळी महायुतीचा उमेदवार कसा पराभूत होईल, यासाठी काम करत होती. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत या टोळीने भाजपच्या शीतल गंभीर यांचाही पराभव कस होईल, यासाठी काम केले. पण शीतल गंभीर विजयी झाल्या. तर प्रिया सरवणकर यांच्या पराभवासाठीही भाजपमधील हीच टोळी सक्रिय होती. भाजप अशा पद्धतीने काम करेल याची आम्हाला कल्पना नव्हती.
भाजपमधील एक व्यक्ती शेलार साहेबांना घाणेरड्या भाषेत बोलत होती. जो पक्षाचा आदेश होता तो डावलून या टोळीने काम केले आहे. यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. पक्षाचा लेबल असल्याने त्या व्यक्तीचे ऐकले जातेय, पण त्यांनी निवडणुकीत आम्हाला मदत केली नाही. या व्यक्तीबदल आम्ही कळवायच्या अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वरिष्ठांना कळवले होते, असेही समाधान सरवणकर यांनी सांगितले.




